"कृपा करा... पोलिसांचे ऐका अन्‌ सूचनांचे पालन करा!"

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 10 April 2020

अधिक लोक एकत्र येण्याने धोका वाढणार आहे. ऐकले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा निर्वाणीचा इशारा भुजबळ यांनी दिला. शहर आणि जिल्हावासीयांना संशयित आढळल्यास त्याची माहिती सरकारी यंत्रणेला अथवा पोलिसांना द्यावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, की लोकांचे जीव वाचावेत म्हणून प्रशासन, सरकार प्रयत्न करत आहे. त्यास सर्वांची साथ मिळायला हवी. 

नाशिक : कृपा करा... पोलिसांचे ऐका. सरकारच्या सूचनांचे पालन करा. अधिकाऱ्यांना सहकार्य करा, अशी साद शहर आणि जिल्हावासीयांना गुरुवारी (ता. 9) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घातली. तसेच भाजी, किराणा, रेशनसाठी एकत्र येऊ नका, असे सांगत असताना त्यांनी कुठेही एकत्र न येण्याबद्दल दिलेल्या धर्मगुरूंच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहनही केले. 

धर्मगुरूंनी कुठेही एकत्र येऊ नका असं सांगितलंय 
अधिक लोक एकत्र येण्याने धोका वाढणार आहे. ऐकले नाही, तर परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा निर्वाणीचा इशारा भुजबळ यांनी दिला. शहर आणि जिल्हावासीयांना संशयित आढळल्यास त्याची माहिती सरकारी यंत्रणेला अथवा पोलिसांना द्यावी, असेही त्यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले, की लोकांचे जीव वाचावेत म्हणून प्रशासन, सरकार प्रयत्न करत आहे. त्यास सर्वांची साथ मिळायला हवी. 

हेही वाचा > #Lockdown : 'लॉकडाउन'च्या अंधारावर उमटली चार चिमुकली पावले...'ते' देवदूतासारखे धावले मदतीला!

मालेगावमध्ये "कर्फ्यू' कडक 
मालेगावमध्ये "कर्फ्यू' अधिक कडक केला जाईल. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल. प्रशासन आणि सरकार मालेगावकरांची काळजी घेत आहे. रुग्ण सापडतील त्या विभागात तपासणी करून आणखी कुणाला लागण झाली आहे काय, याची माहिती घेण्यात येत आहे, असे सांगून श्री. भुजबळ म्हणाले, की हिंदू-मुस्लिम, शीख, इसाई अशा सर्व समाजबांधवांना त्यांच्या धर्मगुरूंनी घरात बसून पूजा-अर्चा करा, असे सांगितले आहे. त्यामुळे आरती, नमाजपठण करण्यासह इतर धार्मिक कारणांसाठी एकत्र जमू नये. 

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal appeals to follow police,s instruction nashik marathi news