esakal | टायरबेस मेट्रो, शहर बससेवा महापालिकेला परवडतील का?
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal-jpg

रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती व आरोग्य सुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. या सुविधा अधिक सक्षमपणे पुरविण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. टायरबेस मेट्रो, शहर बससेवा हे प्रकल्प महापालिकेला परवडतील का, याचा अभ्यास करायला हवा. देशातील इतर शहरांमध्ये मोठ्या प्रकल्पांची स्थिती काय आहे, याचा अभ्यास केला पाहिजे.

टायरबेस मेट्रो, शहर बससेवा महापालिकेला परवडतील का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेने टायरबेस मेट्रो, शहर बससेवा प्रकल्प हाती घेतले खरे; परंतु मोठे प्रकल्प राबविण्यापूर्वी व्यवहार्य ठरू शकतात का याचा विचार व्हायला हवा, असा सल्ला देत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी स्वच्छता, डास निर्मूलन, चांगली उद्याने व पथदीप या महापालिकेच्या मूलभूत कर्तव्यांकडे लक्ष वेधत कानपिचक्‍या दिल्या.

पालकमंत्र्यांचा सवाल; मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्याच्या सूचना

महापौर सतीश कुलकर्णी यांनी सोमवारी (ता. 20) पालकमंत्री छगन भुजबळ यांची भुजबळ फार्म येथे भेट घेऊन महापालिकेसंदर्भातील मागण्यांचे निवेदन सादर केले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भुजबळ यांनी भूमिका स्पष्ट केली. रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती व आरोग्य सुविधा पुरविणे महापालिकेचे कर्तव्य आहे. या सुविधा अधिक सक्षमपणे पुरविण्याकडे अधिक लक्ष दिले पाहिजे. टायरबेस मेट्रो, शहर बससेवा हे प्रकल्प महापालिकेला परवडतील का, याचा अभ्यास करायला हवा. देशातील इतर शहरांमध्ये मोठ्या प्रकल्पांची स्थिती काय आहे, याचा अभ्यास केला पाहिजे. नागरिकांच्या गरजा ओळखून निर्णय घ्यायला हवा, असे मत महापौरांकडे व्यक्त केल्याचे भुजबळ यांनी सांगितले. पालकमंत्री या नात्याने महापालिकेला सर्वतोपरी सहकार्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. वादग्रस्त प्रकल्पांची चौकशी महापालिकेतर्फे मोठ्या प्रकल्पांच्या निविदाप्रक्रियेत अनियमितता झाल्याच्या चर्चा आहेत. परंतु यासंदर्भात तक्रारी प्राप्त झाल्यास चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा>  लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

go to top