esakal | लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..
sakal

बोलून बातमी शोधा

pee.jpg

नाशिकहून मालेगावकडे बोलेरो पिक-अप (नवीन टेम्पररी एमएच 47, टीसी 44-201) घेऊन जात असताना, त्याने लघुशंकेसाठी टेहेरे शिवारात पिक-अप थांबविली. त्याचवेळेस मारुती व्हॅनसारख्या दिसणाऱ्या कारमधून 28 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी उतरले.​

लघुशंकेसाठी थांबणे असे महागात पडले की..

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) लघुशंकेसाठी थांबलेल्या परप्रांतीय बोलेरो चालकास मारुती व्हॅनमधून आलेल्या तिघा अनोळखींनी छर्ऱ्यांच्या बंदुकीचा धाक दाखवून पिक-अप बोलेरो, दहा हजारांची रोकड, कपडे आदी पाच लाख 60 हजार रुपयांचा ऐवज नेला. या तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 
 
असा घडला प्रकार

महामार्गावरील टेहेरे शिवारातील पेट्रोलपंपाजवळ शनिवारी (ता. 18) हा प्रकार घडला. कृष्णकुमारसिंग चंद्रसेठसिंग (वय 39, उत्तर प्रदेश) हा महिंद्र कंपनीच्या नवीन पिक-अप गाड्या कोणत्याही राज्यात पोचविण्याचे काम करतो. नाशिकहून मालेगावकडे बोलेरो पिक-अप (नवीन टेम्पररी एमएच 47, टीसी 44-201) घेऊन जात असताना, त्याने लघुशंकेसाठी टेहेरे शिवारात पिक-अप थांबविली. त्याचवेळेस मारुती व्हॅनसारख्या दिसणाऱ्या कारमधून 28 ते 30 वयोगटातील तीन अनोळखी उतरले. आमच्या दोन माणसांना मालेगावला सोडून दे, असे सांगत त्यांनी कृष्णकुमारसिंगचे तोंड दाबून त्याला मारहाण करण्यास सुरवात केली. एकाने त्याच्या डोक्‍याला खेळण्यातील छर्ऱ्यांची बंदूक लावली. जीव वाचविण्यासाठी बंदूक हिसकावून तो मदतीसाठी जवळच्या पेट्रोलपंपाकडे पळाला. त्याच वेळेस तिघा भामट्यांनी बोलेरो पिक-अप, रोकड व गाडीतील सामान पळवून नेले.

हेही वाचा>  PHOTOS : शटरचा आवाज ऐकून 'त्याला' जाग आली..बघतो तर काय धक्काच....

भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

या अज्ञात भामट्यांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे  भामटे 28 ते 30 वयोगटातील असून पुढील तपास सुरु आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असून  भामट्या चोरांपासून सावध होणे आवश्यक आहे.

हेही वाचा> "माझ्या सासूशी फोनवर बोला अन् बायकोला नांदायला पाठवा"..तिने नकार देताच..