दीड कोटी कार्डधारकांना मिळणार मोफत हरभराडाळ; वाचा सविस्तर

महेंद्र महाजन
Friday, 14 August 2020

राज्यातील एक कोटी ५३ लाख कार्डधारकांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यासाठी मोफत हरभराडाळ वितरित करण्यात येणार आहे. त्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

नाशिक : राज्यातील एक कोटी ५३ लाख कार्डधारकांना जुलै ते नोव्हेंबर महिन्यासाठी मोफत हरभराडाळ वितरित करण्यात येणार आहे. त्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली आहे, अशी माहिती अन्न व नागरीपुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 

छगन भुजबळ : मंत्रिमंडळाची मिळाली मान्यता 
भुजबळ म्हणाले, की कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत राज्यातील अंत्योदय अन्न योजनेमधील २४ लाख ५७ हजार, प्राधान्य कुटुंबातील एक कोटी २८ लाख अशा कार्डधारकांना एक किलो अख्खा हरभरा देण्यात येणार होता. त्याऐवजी कार्डधारकास मोफत हरभराडाळ देण्यात येईल. ८६ हजार २५८ टन हरभरा देण्यात येणार होता. मात्र अख्खा हरभरा खाण्याचे राज्यात प्रमाण कमी आहे. तसेच राज्यात आगामी गणेशोत्सव व दिवाळी हे सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन हरभराडाळीला मागणी राहणार असल्याने मंत्रिमंडळाने मान्य केले. त्यामुळे प्रत्येक कार्डला एक किलो मोफत हरभराडाळ दिली जाईल.  

हेही वाचा > VIDEO : पहिल्याच प्रयत्नात झाला अधिकारी! सामान्‍य रिक्षाचालकाच्या मुलाची उंच भरारी...

हेही वाचा > हृदयद्रावक! ताई आता कोण बांधणार गं राखी.. रिकामे मनगट घेऊन भावंड बघताएत वा

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal gave information about cardholders will get free gram flour nashik marathi news