
"माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी."
नाशिक : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, यात शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता नाशिक शहरात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. अशातच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - छगन भुजबळ
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
मास्क न वापरल्यास प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल
जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून, यात शहरातील रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता नाशिक शहरात रात्री अकरा ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदी लागू केली आहे. तसेच, जिल्हाभरात मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करत एक हजार रुपये दंड केला जाणार असून, प्रसंगी फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, अशी माहिती (ता.२१) पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लग्न समारंभांना परवानगी आवश्यक
लग्न समारंभांसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असेल. नागरिकांनी गोरज मुहूर्ताचा आग्रह न धरता उपस्थिती मर्यादित राहील, या पद्धतीने सोहळ्यांचे नियोजन करावे. यासंदर्भात लॉन्स, मंगल कार्यालयांच्या संचालकांना सूचना केल्या जाणार आहेत. तसेच, लग्न समारंभांमध्ये धडक कारवाई करतानाच मास्क न वापरणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे श्री. भुजबळ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
सरकारी कर्मचाऱ्यांनी २८ पर्यंत लस घ्यावी
६९ हजार सरकारी कर्मचाऱ्यांपैकी सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधकात्मक लस घेतली आहे. पुढील टप्प्यात सामान्यांसाठीही लसीकरण मोहीम राबवायची असल्याने, सरकारी कर्मचाऱ्यांनी येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत लसीकरण करून घेण्याचे आवाहन भुजबळ यांनी केले. ८० हजार लसीकरणासाठीचा औषधसाठा उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय