अपघातग्रस्तांना तातडीने आवश्‍यक मदत द्या : छगन भुजबळ 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 29 January 2020

दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना परिवहन विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा सूचना केल्या. त्याचप्रमाणे जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांनाही आवश्‍यक ती शासकीय मदत द्यावी, असे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच आपण स्वतः परिवहन विभागाशी चर्चा करून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आणि जखमी व्यक्तींना मदत मिळवून दिली जाईल, असे आश्‍वासित केले. 

नाशिक : मेशी (ता. देवळा) गावानजीक रिक्षा आणि बसचा भीषण अपघात होऊन बससह रिक्षा विहिरीत कोसळ्याची घटना घडली. यामध्ये जवळपास 21 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून, जवळपास 35 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळताच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच तहसीलदार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करत अपघातग्रस्तांना तातडीची सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश दिले. 

लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा सूचना

दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना परिवहन विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर मदत मिळवून देण्याचा सूचना केल्या. त्याचप्रमाणे जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांनाही आवश्‍यक ती शासकीय मदत द्यावी, असे आदेश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच आपण स्वतः परिवहन विभागाशी चर्चा करून मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आणि जखमी व्यक्तींना मदत मिळवून दिली जाईल, असे आश्‍वासित केले. 

क्लिक करा > VIDEO : यमाची काळी सावली पोहोचली पण...आजी अन् नातीची व्यथा..

कॉंग्रेस कार्यकर्तेही मदतकार्यात सहभागी

नाशिक जिल्ह्यातील देवळा रस्त्यावर बसचा झालेल्या भीषण अपघात सुन्न करणारा आहे. मी सातत्याने प्रशासकीय यत्रणेशी संपर्कात आहे. वैद्यकीय पथकेही घटनास्थळी आहेत. जखमींवर तत्काळ उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कॉंग्रेस कार्यकर्तेही मदतकार्यात सहभागी झाले आहेत. -बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री व प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस  
 
क्लिक करा > PHOTOS : काही समजण्याच्या आतच..तीस सेकंदात खेळ झाला...अन्‌..​

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal on malegaon bus accident nashik marathi news