esakal | "कोरोनाने होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास व उपाययोजना करा"
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhujbal234.jpg

शहर व तालुक्यात पुन्हा सर्व्हे करून कोमॉर्बिड रुग्णांचा नव्याने शोध घेऊन औषधे उपलब्ध करा, अधिक बेडची व्यवस्था करावी, त्यादृष्टीने उपजिल्हा रुग्णालयाचे तातडीने काम करावे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

"कोरोनाने होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास व उपाययोजना करा"

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली असताना पुन्हा नव्याने रुग्ण वाढत आहे, हा चिंतेचा विषय आहे. शिवाय कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या कारणांचा सखोल अभ्यास करून मृत्युदर रोखण्यासाठी अधिक उपाययोजना कराव्यात, असे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन
शहर व तालुक्यात पुन्हा सर्व्हे करून कोमॉर्बिड रुग्णांचा नव्याने शोध घेऊन औषधे उपलब्ध करा, अधिक बेडची व्यवस्था करावी, त्यादृष्टीने येवला उपजिल्हा रुग्णालयाचे तातडीने काम करावे, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिले. नागरिकांनी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

हेही वाचा > पहाटेची वेळ...मंदिरात आश्रयाला थांबलेले गुराखी दुर्गंधीने अस्वस्थ; शोध घेताच बसला धक्का

मृत्यूच्या कारणांचा अभ्यास अन् उपाययोजना करा 

तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुरवस्था बघता रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम तातडीने हाती घेण्यात येऊन खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना करत त्यांनी शेतकरी कर्जमाफी, पीककर्ज, गणेशोत्सवाबाबत आढावा घेतला. 
आमदार दराडे यांनी कर्ज वाटपाच्या संदर्भात होणाऱ्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधत सूचना केल्या. या वेळी संपर्क कार्यालयप्रमुख बाळासाहेब लोखंडे, अरुण थोरात, अध्यक्ष वसंत पवार, दीपक लोणारी, सुनील पैठणकर, मोहन शेलार, जयदत होळकर, साहेबराव मढवई, सचिन कळमकर, तसेच तहसीलदार रोहिदास वारुळे, निफाड तहसीलदार दीपक पाटील, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शैलजा कृपास्वामी, डॉ. सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड, गटविकास अधिकारी उमेश देशमुख, संदीप कराड, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील, कारभारी नवले, पोलिस निरीक्षक संदीप कोळी व अनिल भवारी, खंडेराव रंजवे आदी अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > भरचौकात 'त्याने' थेट वाहतूक पोलिसाच्याच श्रीमुखात भडकावली...नेमके काय घडले?

गर्दी टाळण्याच्या सूचना
दरम्यान, शहरात गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी शहारालगत असलेल्या अंगणगाव पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घाटाची पाहणी केली. या वेळी विसर्जनासाठी घाटाची स्वच्छता, गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.२४) येथील शासकीय विश्रामगृहातील आढावा बैठकित ते बोलत होते. या वेळी आमदार किशोर दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल पाटील, निफाड प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संपादन - ज्योती देवरे