esakal | छगन भुजबळांनी केली पार्थ पवारांची पाठराखण; म्हणाले... 
sakal

बोलून बातमी शोधा

chhagn bhujbal and parth pawar.jpg

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना खरमरीत शब्दांमध्ये फटकारल्यानंतर पक्षात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

छगन भुजबळांनी केली पार्थ पवारांची पाठराखण; म्हणाले... 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे युवा नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना खरमरीत शब्दांमध्ये फटकारल्यानंतर पक्षात चांगलीच खळबळ उडाली. त्यानंतर छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

‘नया है वह’ - छगन भुजबळ

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शरद पवार यांनी पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही अशा शब्दांत बुधवारी फटकारलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ‘नया है वह’ अशी मार्मिक टिप्पणी केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

हेही वाचा > "कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

पवार कुटुंबात कोणीही नाराज नाही

“शरद पवारांनी सांगितल्यावर मी पुन्हा त्यावर काही बोलण्याची, सांगण्याची गरज नाही. शरद पवारांनी ते थोडे अपरिपक्व असल्याचं म्हटलं आहे. हिंदीत सांगायचं झालं तर नया है वह,” असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. यावेळी छगन भुजबळ यांनी 'पवार कुटुंबीयांमध्ये कोणतेही वाद नसल्याचं सांगितलं. सुशांत सिंह प्रकरणाशी आदित्य ठाकरे यांचा काहीही संबंध नाही,' असं म्हणत भुजबळ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

संपादन - ज्योती देवरे