"शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामांसाठी निधी मिळण्यास सुरवात"

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 9 March 2020

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भुजबळ यांनी रस्त्यांच्या कामांसाठी निधीचा आग्रह धरला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विकासकामांसाठी निधी मिळण्यास सुरवात झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील 137 रस्त्यांच्या सुधारणांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार 583 कोटी 87 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील विकासाचा "बॅकलॉग' भरून काढण्यास सुरवात झाली आहे, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. 

नाशिकच्या विकासकामांसाठी निधी मिळण्यास सुरवात

गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भुजबळ यांनी रस्त्यांच्या कामांसाठी निधीचा आग्रह धरला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या विकासकामांसाठी निधी मिळण्यास सुरवात झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 

जिल्ह्यातील 137 रस्त्यांसाठी एक हजार 584 कोटींची तरतूद ​
येवला मतदारसंघातील 18 रस्त्यांसाठी 47 कोटींच्या निधीचा यात समावेश आहे. त्यामुळे येवला मतदारसंघासह जिल्ह्यातील रस्त्यांना झळाळी प्राप्त होणार असून, कामांना लवकर सुरवात होणार आहे. येवल्यातील रस्त्यांसाठी मंजूर झालेला निधी रुपयांमध्ये असा- 

अनकाई-न्यायगव्हाण-पिंपळखुटे-पहाळसाठे-राजापूर - एक कोटी 80 लाख,

प्रमुख राज्य मार्ग दोन ते नैताळे ते राज्य मार्ग 27, दिंडोरी तास-खानगाव थडी-तारुखेडले-तामसवाडी-खेडले झुंगे-कोळगाव-रुई-धानोरे-डोंगरगाव-विंचूर-विठ्ठलवाडी-कोटमगाव राज्य मार्ग 27 - चार कोटी 50 लाख,

पाटोदा-सावरगाव-नगरसूल-वाईबोथी-भारम - दोन कोटी,

राष्ट्रीय मार्ग 10 ते तांदूळवाडी-गुजरखेडा-विखरणी-कातरणी - पाच कोटी पाच लाख,

सावरगाव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे-महालखेडा-चोरवड-दत्तवाडी-शिरवाडे - दोन कोटी 40 लाख,

तिसगाव-बहादुरी-वडनेरभैरव-वडाळीभोई - दोन कोटी 50 लाख,

येवला गणेशपूर (सुकी) हडपसावरगाव-जायदरे - दोन कोटी 50 लाख,

येवला-पारेगाव-निमगावमढ-महालखेडा-भिंगारे-पुरणगाव - पाच कोटी 49 लाख. 

हेही वाचा > लग्न जमण्याच्या आधीच 'दोघांना' भेटणं पडलं चांगलच महागात...! 

रस्त्यांसाठीचा निधी 
 सावरगाव-धुळगाव-एरंडगाव-भिंगारे-महालखेडा चोरवड-दत्तवाडी-शिरवाडे-वाकद ते नगर जिल्हा हद्द - दोन कोटी 78 लाख 
 मुखेड-जळगाव नेऊर-सातारे-पिंप्री-ठाणगाव-गुजरखेडा - दोन कोटी 80 लाख 
 मऱ्हळगोई-वाहेगाव-नांदगाव-धारणगाव-गाजरवाडी - तीन कोटी 50 लाख 
चांदवड-लासलगाव-विंचूर रस्ता - सहा कोटी  

हेही वाचा > एक स्त्रीलाच दुसरी स्त्री नकोशी!...अज्ञात निष्ठुर मातेने 'नकोशीला' झाडाच्या अडचणीत टाकून केले पलायन

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal said about Funding for development works Nashik Marathi News