"नाशिककरांनो..आता सातच्या आत घरात.." छगन भुजबळ यांचे स्पष्टीकरण.

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 30 June 2020

नाशिक शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे स्पष्टीकरण पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज (ता.३०)  छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकिय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. 

नाशिक : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे. शहरातील व्यापारी संघटनांनीही सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत आपली दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ५ वाजेनंतर आपोआपच गर्दी कमी होण्यास मदत होईल याचा विचार करता नाशिक शहरात सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे स्पष्टीकरण पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आज (ता.३०)  छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत शासकिय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदि उपस्थित होते.

ठक्कर डोम मधील कोव्हीड सेंटर उभारणारच - भुजबळ 
कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता राज्य शासनाने ३१ जूलैपर्यंत लॉकडाउन कायम ठेवला आहे. विविध जिल्हयांमध्ये पुन्हा लॉकडाउनचा निर्णय घेण्यात आला. त्याचधर्तीवर नाशिकमध्ये ठक्कर डोम मधील कोव्हीड सेंटर उभारणार का? यावर भुजबळांनी स्पष्टीकरण दिले आहे. यासाठी सामाजिक संस्था पुढे येऊन मदत करण्यास तयार आहेत. तसेच सीएसआरच्या माध्यमातून अनेक कंपन्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आहे..

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

तज्ञ डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत

जिल्हयात आतापर्यंत कोरोना आजाराने २३६ जणांचा मृत्यु झाला यात ९९ मृत्यु नाशिक शहरात झाले. यातील १३६ लोकांचे वयोमान हे ४० ते ४५ वर्ष वयोगटातील असून तरूणांचा मृत्युदर ६० टक्के असल्याने ही गंभीर बाब आहे. जिल्हा रूग्णालयात डॉक्टर्स तसेच पॅरामेडीकल स्टाफची कमतरता आहे. मध्यंतरी भरती प्रक्रियाही राबवली गेली मात्र दोनशे डॉक्टरांपैकी अवघे ३० डॉक्टर्स रूजू झाले त्यामुळे आता रूग्णांच्या उपचारासाठी शहरातील खाजगी डॉक्टर्स तसेच तज्ञ डॉक्टरांची सेवाही अधिग्रहीत करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: chhagan bhujbal said about Public curfew in Nashik city marathi news