"कोरोना काळात आता मी जेलमध्ये असतो तर..." खुमासदार शैलीत भुजबळांनी सांगितला ऑर्थर जेलमधील अनुभव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

ऑर्थर जेलमध्ये मी चांगला अडीच वर्ष होतो. नंतर जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा कोरोना सुरु झालं आणि मी म्हटलं आता जर आपण आतमध्ये असतो तर काय झालं असतं." पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रथमच ऑर्थर जेलसंदर्भातील आठवण जाहीरपणे बोलून दाखवली.

नाशिक : "ऑर्थर जेलमध्ये मी चांगला अडीच वर्ष होतो. नंतर जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा कोरोना सुरु झालं आणि मी म्हटलं आता जर आपण आतमध्ये असतो तर काय झालं असतं." पालकमंत्री छगन भुजबळ यांनी प्रथमच ऑर्थर जेलसंदर्भातील आठवण जाहीरपणे बोलून दाखवली. पोलीस कोवीड सेंटरच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.आपल्या खुमासदार शैलीत भुजबळांनी कारागृहातला अनुभव सांगितला.

मीही अडीच वर्ष जेलमध्ये मुक्कामी - छगन भुजबळ

भुजबळ पुढे म्हणाले की, नाशिकचे सध्याचे पोलीस आयुक्त दीपक पांडे हे ज्या ऑर्थर जेलमध्ये अधिकारी होते तेथे मीही अडीच वर्ष मुक्कामी होतो. जेलमधून बाहेर आलो आणि कोरोनाचं प्रकरण सुरु झालं. मी म्हटलं आता जर आपण आतमध्ये असतो तर काय झालं असतं. कारण मला कल्पना आहे. जेलमध्ये १० पट कैदी आहेत. पण आता शंका मनातून दूर झाली आहे. पाण्डेय साहेबांनी चांगली व्यवस्था केली होती.

हेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ

आर्थर रोड कारागृहातील तो अडीच वर्षांचा काळ

नाशिक शहर आणी ग्रामीण दलात कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हे कोविड सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी नुकताच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या संकल्पनेतील हे सेंटर तयार करण्यात आलं आहे. यावेळी त्यांनी बोलताना आर्थर रोड कारागृहातील कैद्यांना कसं कोरोना मुक्त केलं हे त्यांनी सांगितलं. याचाच धागा पकडत भुजबळांना आपला आर्थर रोड कारागृहातील अडीच वर्षांचा काळ आठवला.

अदलाबदली होवून नवीन योद्धे नाशिकमध्ये
बरेचसे अधिकारी अदलाबदली होवून नवीन योद्धे नाशिकमध्ये आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय, नाशिक ग्रामीणल सचिन पाटील, महापालिका आयुक्त म्हणून कैलास जाधव आले आहेत. जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून लीना बनसोड आल्या. उर्वरित आम्ही तिघे (विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे) जुने योद्धे आहोत, असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal shared his experience in Arthur Jail nashik marathi news