वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते...

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 17 February 2020

वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले महाराष्ट्र गोवा बार काउंसिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते.

नाशिक : वकील आणि कोर्ट म्हटलं की मला हुडहुडी भरते, असे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले महाराष्ट्र गोवा बार काउंसिल आणि नाशिक बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वकील परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात छगन भुजबळ बोलत होते. देशातील काही भागांमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात चिडफाड होत आहे. ते गरजेचं आहे. कारण काही ठिकाणी लोकांना त्रास होत आहे. सामान्य माणसांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर अप्रत्यक्ष टीका केली

सिनेमात जशी मजा दाखवली जाते तशी मला कोर्टात दिसली नाही.

कोणत्याही खटल्यात मीडिया ट्रायल आधी निकाल लावून मोकळी होते. जो दोषी नाही त्याला त्रास होता कामा नये. मात्र, आता मीडियातच निकाल लागून जातो, असे  छगन भुजबळ यावेळी म्हणाले. कोर्टात एखादे वकील मोठ्याने बोलतात तर कोणी हळू बोलतं. मात्र, सिनेमात जशी मजा दाखवली जाते तशी मला कोर्टात दिसली नाही. सत्य बाहेर काढण्याची गरज आहे. मात्र होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होतं करतो तोच मोठा वकील असा दावा छगन भुजबळ यांनी केला.

हेही वाचा > 'सर, याच्याकडे बंदूक आहे!'...अन् शाळेत उडाली खळबळ...

नाशिकला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं

सर्वच मंत्री चांगले नसतात, सर्वच वाईटही नसतात. मात्र, जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही नक्की करणार, असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. याशिवाय नाशिकला मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ व्हावं, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केला.

हेही वाचा > PHOTO : खेळता खेळता 'ती' थेट पोहचली अनोळखी रस्त्यावर...अन्


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal statement about fear court and advocates Nashik Marathi News