VIDEO : "राज्यात कमळावर निशाणा साधण्यासाठी धनुष्य..किती वेळात तीर चालवण्यासाठी घड्याळ..बाण चालवण्यासाठी काँग्रेसचे हात"

सकाळ वृत्तसेवा
Friday, 7 February 2020

राज्यात कमळावर निशाणा साधण्यासाठी धनुष्य आहे, किती वेळात तीर चालवायचा यासाठी घड्याळ आहे, तर बाण चालवण्यासाठी काँग्रेसचे मजबूत हात आहे. दिल्लीतील निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन कमळवर छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे.

नाशिक - राज्यात कमळावर निशाणा साधण्यासाठी धनुष्य आहे, किती वेळात तीर चालवायचा यासाठी घड्याळ आहे, तर बाण चालवण्यासाठी काँग्रेसचे मजबूत हात आहे. दिल्लीतील निवडणुकीनंतर होऊ घातलेल्या भाजपच्या महाराष्ट्रातील मिशन कमळवर छगन भुजबळ यांनी टोला लगावला आहे. महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार छगन भुजबळ यांनी आज (ता.७)  गंगापूर येथील बोटक्लबच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. 

नाशिक स्मार्ट करण्यासाठी अनेक प्रकल्प  

छगन भुजबळ यांचा सध्या नाशिक दौरा सुरु असून काल म्हणजेच गुरूवारी मलजलावर प्रक्रिया करून पाणी गोदावरी नदीमध्ये सोडले जात असल्याच्या दाव्याची प्रत्यक्ष पाहणी गुरुवारी (ता. 6) पालकमंत्री छगन भुजबळ आणि आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनी केली. नाशिक स्मार्ट करण्यासाठी अनेक प्रकल्प राबविले जात असले, तरी जोपर्यंत गोदावरी पूर्णपणे स्वच्छ, निर्मल होत नाही, तोपर्यंत स्मार्टसिटीला काहीही अर्थ नसल्याचे सांगत स्मार्टसिटींतर्गत गोदाकाठी राबविलेल्या जाणाऱ्या प्रकल्पांमध्ये पर्यावरणाच्या दृष्टीने बदल सुचविताना त्यात कसूर राहिल्यास कायदेशीर बडगा उगारण्याचा इशारा भुजबळ यांनी या वेळी दिला. गोदापात्रात मलजलाचा एक थेंब पोचू नये यासाठी उपाययोजना करण्याची सक्त ताकीद स्मार्टसिटी कंपनी व महापालिका प्रशासनाला त्यांनी दिली.

हेही वाचा > तमाशातच भयंकर तमाशा! दारूची नशा अन् कलांवतांसोबत धक्कादायक प्रकार!​

हेही वाचा > PHOTOS : बहिण-भावाची भेट होण्यापूर्वीच मोठा आक्रोश... ह्रदय पिळवटून टाकणारी घटना.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chhagan Bhujbal statement on political party in state Nashik Marathi Political News