
भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून त्रास देण्यासाठी भाजपकडून ‘ईडी’चा गैरवापर होत आहे असे म्हटले आहे.
नाशिक : भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस देण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केल्यापासून त्रास देण्यासाठी भाजपकडून ‘ईडी’चा गैरवापर होत असल्याचे म्हटले आहे.
‘ईडी’ची टांगती तलवार कायम राहणार
भुजबळ म्हणाले की जो विरोधात बोलेल, त्याला ‘ईडी’च्या माध्यमातून त्रास देण्याचे षडयंत्र केंद्रातील भाजप सरकारकडून सुरू आहे. हे आता नवीन राहिलेले नाही. एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशकर्ते झाले, त्याचवेळी ‘ईडी’च्या नोटिशीचा सासेमिरा मागे लागेल हे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे केंद्रीय आर्थिक महासंचालनालय अर्थात, ‘ईडी’ची टांगती तलवार कायम राहणार असल्याचे राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
हेही वाचा - वडिलांसोबतची लेकीची 'ती' ड्राईव्ह शेवटचीच; पित्याचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश
भुजबळांचा भाजपवर हल्लाबोल
नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला. यूपीएच्या झेंड्याखाली सर्व पक्ष एकत्र आल्यास भाजपला रोखणे सहज शक्य आहे. त्यासाठी एकत्र यावे लागेल. शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी ‘सामना’तून लिहिलेला अग्रलेख उद्वेगातून आला. पीकविम्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप भुजबळ यांनी फेटाळताना विमा कंपन्या आर्थिक फायदा बघत असल्याचे स्पष्ट केले. टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागतात, त्या वेळी टोल कंपन्यांनी सहानुभूतीने वागण्याचा सल्ला देताना वाहनांच्या लांब रांगा लागू नये, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
हेही वाचा - जेव्हा पोटच्या गोळ्यांसह मातेचे मृतदेह दिसले पाण्यावर तरंगताना; शेतकऱ्यांना भरला थरकाप