esakal | "उद्योजकांसाठी "फॅसिलिटी'ची भूमिका सरकारने बजवावी" 
sakal

बोलून बातमी शोधा

chagan bhujbal 1212.jpg

आज अनेक तरुण नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांनी उद्योग, व्यवसायाकडेही सकारात्मकरित्या पाहायला हवे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. आज शंभर टक्के सहकारी साखर कारखाने बंद असून, खासगी साखर कारखाने सुरू आहेत. कारण सहकारी क्षेत्रावर व सहकार क्षेत्रावर अनेक बंधने आहेत. त्यामुळे उद्योगात पडलो असे न म्हणता उद्योगात यशस्वी होणार असे म्हणून वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. 

"उद्योजकांसाठी "फॅसिलिटी'ची भूमिका सरकारने बजवावी" 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कुठल्या तरी कर अथवा नियमावलीच्या माध्यमातून राजकारणीच अडथळे निर्माण करतात, असे उद्योजकांना वाटत असते. वास्तविक उद्योजकांसाठी सरकारने फॅसिलिटीच्या भूमिकेत असायला हवे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी (ता. 26) केले. 
कॉलेज रोड, गंगापूर रोड, वाणी मित्रमंडळातर्फे गोविंदनगर येथील मनोहर गार्डन बॅक्वेट हॉलमध्ये झालेल्या "उद्योगविश्‍व 2020' कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर, उपाध्यक्ष योगेश राणे, संजय बागड, सरचिटणीस संजय दुसे, चिटणीस राजेंद्र कोठावदे, खजिनदार हर्षद चिंचोरे, सहखजिनदार हितेश देव आदी उपस्थित होते. 

उद्योगात यशस्वी होणार असे म्हणून वाटचाल करावी -छगन भुजबळ

श्री. भुजबळ म्हणाले, की आज अनेक तरुण नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करतात. पण त्यांनी उद्योग, व्यवसायाकडेही सकारात्मकरित्या पाहायला हवे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे झाले पाहिजे. आज शंभर टक्के सहकारी साखर कारखाने बंद असून, खासगी साखर कारखाने सुरू आहेत. कारण सहकारी क्षेत्रावर व सहकार क्षेत्रावर अनेक बंधने आहेत. त्यामुळे उद्योगात पडलो असे न म्हणता उद्योगात यशस्वी होणार असे म्हणून वाटचाल करावी, असेही त्यांनी सांगितले. 

उद्योगविश्‍व, तरुण उद्योजक पुरस्कार प्रदान 
उद्योगविश्‍व पुरस्कार आर्किटेक्‍ट रवींद्र अमृतकर, डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ. मिलिंद शिरोडकर, पुण्यातील अभिनव ग्रुपचे संचालक श्‍यामकांत शेंडे यांना दिला. बांधकाम व्यावसायिक अभय नेरकर यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरविले. नवीन कार्यकारिणीची निवड राजेश कोठावदे, संस्थापक अध्यक्ष नितीन दहिवेलकर यांनी जाहीर केली. योगेश राणे यांची अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. 

हेही वाचा > शंभर वर्षांचं गुहेतलं "त्यांचं" वास्तव्य..कठीण वनवास..अन् गुहेतून गृहप्रवेश!

अनंत अडचणींचा सामना करावा लागला

महाबळेश्‍वर येथील सनराइस कॅन्डल्सचे भावेश भाटिया म्हणाले, की जग आपल्याकडे बघत नाही, अशी भावना बहुतांश वेळा आपल्या मनात येते. त्यामुळे अनेकजण नैराश्‍य पत्करतात. अशा व्यक्‍तींनी आपल्या कामगिरीतून जगाचे लक्ष वेधले पाहिजे. सह्याद्री फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे म्हणाले, की शेती हा उद्योग होऊ शकतो, यावर कुणाचाही विश्‍वास नसतांना ते यशस्वी करून दाखविले. अनंत अडचणींचा सामना करावा लागला. मात्र जिद्द न सोडता, सभोवतालच्या शेतकऱ्यांना संघटित करून व्यवसायाला आकार दिला. 

हेही वाचा > आईच निघाली उलट्या काळजाची..शेवटी मुलाने संतापात..​

go to top