esakal | #Lockdown मध्ये निफाडच्या शेतकऱ्याची "अशी" कामगिरी... छगन भुजबळांनीही केले कौतुक!
sakal

बोलून बातमी शोधा

farmer distribute wheat.png

शेतकऱ्याच्या या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर तहसीलदारांनीही त्यांची भेट घेऊन यासंदर्भात कौतुक केले. एरव्ही सामान्यतः सरकारविषयी तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांतील हे दातृत्व समजल्यावर सगळीकडे त्यांची चर्चा होती. 

#Lockdown मध्ये निफाडच्या शेतकऱ्याची "अशी" कामगिरी... छगन भुजबळांनीही केले कौतुक!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / निफाड : देशभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉक डाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत राज्यातील कुठलाही गोरगरीब, शेतकरी, मजूर, बेघर, विद्यार्थी उपाशी राहू नये यासाठी महाविकास आघाडी सरकार विशेष प्रयत्न करत असून राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी चोवीस तास मदत केंद्र सुरु करण्यात आले असून त्याद्वारे नागरिकांचे प्रश्न सोडविले जात आहे.

शेतकऱ्याने राखले सामाजिक भान

अशातच शासनासोबतच आपणही आपले कर्तव्य समजून सामाजिक भान ठेवत नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (निफाड) येथील युवा शेतकरी दत्ता रामराव पाटील यांनी निराधार कुटुंबाना आपल्या शेतातील गहू मोफत उपलब्ध करून दिला. दत्ता रामराव पाटील यांनी केलेल्या सामाजिक कार्यातून समाजापुढे जो आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. याबाबत भुजबळ यांनी दत्ता रामराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करत त्यांच्या या उपक्रमाबद्दल कौतुक करून आभार मानले.

हेही वाचा > #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले​

गव्हाची राशी सामान्यांना वाटून टाकण्याचा निर्णय

कसबे सुकेणे (निफाड) येथील युवा शेतकरी यांनी तीन एकरात गव्हाचे पीक घेतले होते. गव्हाची सोंगणी सुरु असतांनाच देशात 'कोरोना'चा संसर्ग सुरु झाला. त्यामुळे सरकारने लॉकडाऊन केले. अशा स्थितीत निफाड तालुक्‍यातील एक मोठे व मोठ्या संख्येने शेतात मजुरी करणारे, रोजगाराच्या शोधात असलेली कुटुंबे या गावात आहेत. त्यांच्यापुढे मोठा प्रश्‍न निर्माण झाला. रोजगार बंद, घरातच रहायचे. या स्थितीत उदरनिर्वाह कसा करणार? हे लक्षात आल्यावर दत्ता पाटील यांनी मळ्यात एक एकरातील गव्हाची राशी सामान्यांना वाटून टाकण्याचा निर्णय घेतला. त्यांनी गावातील गरीब, गरजु व मजुरांना हा गहू वाटून टाकला. त्यांच्या या उपक्रमाची माहिती मिळाल्यावर तहसीलदारांनीही त्यांची भेट घेऊन यासंदर्भात कौतुक केले. एरव्ही सामान्यतः सरकारविषयी तक्रारी करणाऱ्या शेतकऱ्यांतील हे दातृत्व समजल्यावर सगळीकडे त्यांची चर्चा होती. 

हेही वाचा >"पोलीसकाका..तुम्हीही काळजी घ्या!" चिमुकलीच्या मदतीने पोलीसही भारावले!