मोठ्या आवाज झाला..आई-बाबांच्या काळजाचा चुकला ठोका..अपघाताचा ट्रक मुलांच्या दिशेने आला...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 June 2020

रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर उमराणेच्या बाजूने येणाऱ्या ट्रक वरील चालकाचा ताबा सुटला अन्‌ तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला काही मुले बसलेली असल्याने अपघाताचा आवाज ऐकताच काळजाचा ठोका चुकला..मात्र त्यातही अशी घटना घडली ज्याला चमत्कार अन् दैवाची साथ असचं म्हणावं लागेल.

नाशिक / चांदवड : रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर उमराणेच्या बाजूने येणाऱ्या ट्रक वरील चालकाचा ताबा सुटला अन्‌ तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला काही मुले बसलेली असल्याने अपघाताचा आवाज ऐकताच काळजाचा ठोका चुकला..मात्र त्यातही अशी घटना घडली ज्याला चमत्कार अन् दैवाची साथ असचं म्हणावं लागेल.

अशी घडली घटना

मनमाड-उमराणे रस्त्यावर शिंगवे शिवारातील रानमळ्यात असलेल्या धोकादायक वळणावर उमराणेच्या बाजूने येणाऱ्या ट्रक (एमएच 41, जी 5663)वरील चालकाचा ताबा सुटला अन्‌ तो ट्रक रस्त्याच्या कडेला उलटला. त्याच वेळी रस्त्याच्या कडेला काही मुले बसलेली असल्याने अपघाताचा आवाज ऐकताच काळजाचा ठोका चुकला..मात्र त्यातही अशी घटना घडली ज्याला चमत्कार अन् दैवाची साथ असचं म्हणावं लागेल. ट्रक नालीत कोसळल्याने मुले सुखरूप आहेत हे पाहताच मुले अन्‌ त्यांच्या मातांनी एकमेकांकडे धाव घेत गळ्यात पडून आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

दैव बलवत्तर म्हणून...

या रस्त्याच्या शेजारीच असलेल्या शिवाजी झाल्टे यांच्या शेतात काही महिला मकापेरणी करीत होत्या. अविनाश शिंदे, सागर शिंदे, कुणाल शिंदे, तेजस शिंदे, यशवंत गुंड, तुषार शिंदे ही त्यांची मुले बसलेली असताना अचानक त्यांच्या दिशेने हा ट्रक आला. आपल्याकडे येणाऱ्या ट्रकला पाहून मुले जोरात ओरडली. मात्र ट्रक मुलांच्या जवळून दोन फूट अंतरावरून जात पुढे नालीत आदळल्याने कुणालाही इजा झाली नाही.  

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: children were safe in truck accident nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: