जनतेच्या संभ्रमावस्थेचा मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा - आमदार पडळकर

संदीप पवार
Monday, 12 October 2020

चक्रीवादळात मोठे नुकसान होऊनही अद्याप पुरेशी मदत मिळाली नाही. त्यातच, आरक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यावरून जनता संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे शासनाने जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी येथे केले.

नाशिक : (डीजीपीनगर)राज्यात आजच्या घडीला सर्वसामान्य जनता, शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाले आहेत. चक्रीवादळात मोठे नुकसान होऊनही अद्याप पुरेशी मदत मिळाली नाही. त्यातच, आरक्षण आणि आरोग्याच्या मुद्द्यावरून जनता संभ्रमावस्थेत आहे. त्यामुळे शासनाने जनतेचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष केंद्रित करावे, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.

लोकल, मंदिरे सुरू केली पाहिजेत 

टागोरनगर येथील विजय हाके यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शेतकऱ्यांना मदत पोचावी, कृषी कायद्याचा विचार करावा, केंद्राने केलेला कायदा राज्यात अमलात आणावा, राज्यात बार सुरू केले, पण मंदिरे उघडण्यात आली नाहीत असा सगळा बाजार सुरू आहे. या प्रश्‍नांकडे लक्ष देऊन शासनाने मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली लोकल रेल्वेसेवा सुरू करावी. विशेषत: मुख्यमंत्र्यांनी जाणीवपूर्वक विचार करावा, असेही ते म्हणाले. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

जनतेच्या प्रश्‍नांवर न्याय मागणे चुकीचे आहे का, असा सवाल करून, ते म्हणाले, की समस्या सोडवा म्हणजे इतर ठिकाणी समस्या जाणवणार नाहीत. समस्या खूप आहेत, त्यावर न्याय मागणे गैर आहे का? लोकांच्या राज्यात लोकांना न्याय मिळालाच पाहिजे, असेही त्यांनी या वेळी नमूद केले.

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The CM should consider the confusion of the people - Padalkar nashik marathi news