नाशिक लॉकडाउनच्या निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात..वाचा पालकमंत्री भुजबळ काय म्हणाले.. 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 July 2020

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.17) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभुमीवर ठाणे, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये लॉकडाउन जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत असतांना, त्यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.

नाशिक : राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत नाशिकमध्येही कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शुक्रवारी (ता.17) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्‍वभुमीवर ठाणे, पुण्याच्या धर्तीवर नाशिकमध्ये लॉकडाउन जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत असतांना, त्यांनी यासंदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे.

लॉकडाऊनविषयी निर्णय मुख्यमंत्रीच घेणार

अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतांना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपायांवर चर्चा केली. तसेच रूग्णांना चांगली आरोग्य सेवा मिळेल, यासंदर्भात अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना या बैठकीत केल्या. बैठकीनंतर पालकमंत्री श्री.भुजबळ म्हणाले, की मागणी होत असली तरी लॉकडाऊन करू नये, असे माझे वैयक्‍तिक मत आहे. तरीदेखील नाशिकमध्ये लॉकडाऊन करण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतील. वाढत्या रूग्ण संख्येच्या पार्श्‍वभुमिवर येत्या तीन दिवसांत मुख्यमंत्री उद्भव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांची समिती नाशिक जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भावाचा आढावा घेणार आहेत. यानंतर लॉकडाउन व अन्य उपाययोजनांबाबत निर्णय घेतला जाईल. 

हेही वाचा > हायटेक सल्ला पडला महागात; दोन एकरांतील ऊस जळून खाक...नेमके काय घडले?

पाच वर्षे महाविकास आघाडीचीच सत्ता 

राजस्थानमधील प्रकरण ताजे असतांना, सध्याच्या राष्ट्रीय स्तरावरील राजकारणाबाबत श्री. भुजबळ म्हणाले, की राज्यात पाच वर्षे महाविकास आघाडीचीच सत्ता राहिल. आमदार फूटू नये म्हणून, भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या आमदारांना सत्ता रूपी लॉलीपॉप दाखविले जात असल्याची मिश्‍कील टिका त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा > आयुक्तांची रात्री उशिरा रुग्णालयात एंट्री...चौकशीत मोठा खुलासा...नेमके काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Udhav Thakaray will take decision regarding Nashik LockDown Nashik Marathi News