उत्तर प्रदेशातून 'तो' पुरवायचा कोकेन...अन् मग...

police arrested.jpg
police arrested.jpg

नाशिक : सिन्नर फाटा परिसरात दोन आठवड्यांपूर्वी सुमारे 90 लाखांच्या कोकेनसह तीन संशयितांना अटक केली असता, या संशयितांना कोकेन पुरविणाऱ्यास उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथून अटक केली. 

असा घडला प्रकार..
अशोक दीनदयाळ यादव (रा. नागला हिरामण, ता. सीरसागंज, फिरोजाबाद, उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने 7 तारखेला नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे 89 लाख 78 हजार 500 रुपयांच्या कोकेनसह संशयित मनोजकुमार यादव (रा. फिरोजाबाद, उत्तर प्रदेश), साहेबजाम शेख (रा. अंबड-लिंक रोड, अंबड), नितीन खोडके (रा. सिन्नर फाटा, नाशिक रोड) या तिघांना अटक केली होती. यातील संशयित मनोजकुमार यादव याने उत्तर प्रदेशातून कोकेन नाशिकमध्ये आणले होते. त्यामुळे युनिट दोनचे सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार, हवालदार युवराज पाटील, श्रीराम सपकाळ यांचे पथक गेल्या आठवड्यात फिरोजाबादकडे रवाना झाले होते.

पाच दिवसांची पोलिस कोठडी

संशयित अशोक यादव यास नाशिक पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर संशयिताच्या नातलगांनी हल्ला केला. परंतु त्याही परिस्थितीतून पोलिसांनी संशयित अशोक यादव यास अटक करून आणले. न्यायालयात हजर केले असता, त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कामगिरी पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील, गुन्हे शाखेचे उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त समीर शेख, पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनच्या पथकाने बजावली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com