esakal | काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर
sakal

बोलून बातमी शोधा

coconut 1.jpg

कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस बनविण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेताय. पण अद्यापही लसीची प्रतिक्षा कायम आहे. मात्र भारतीय आहार पद्धतीतील काही घटक कोरोनावर प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे.

काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

sakal_logo
By
अरुण मलाणी : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : कोरोनाचा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव जगातील सर्वच देशांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस बनविण्यासाठी संशोधक दिवसरात्र मेहनत घेताय. पण अद्यापही लसीची प्रतिक्षा कायम आहे. मात्र भारतीय आहार पद्धतीतील काही घटक कोरोनावर प्रतिबंधासाठी अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे प्राथमिक संशोधनातून पुढे आले आहे.

कोरोनावर नारळ व खोबरे तेल ठरतोय रामबाण उपाय?
अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यात कोरोनाचा फैलाव अत्यंत संथ गतीने आणि मर्यादित झाला. तर केरळमध्ये कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असतांना, सद्यस्थितीत परीस्थिती आटोक्‍यात आली आहे. आशिया स्तरावर विचार केल्यास भारतासह पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, थायलॅण्ड येथे कोरोनामुळे मृतांचे प्रमाण अन्य देशांच्या तुलनेत आहे. या सर्व घटकांना एक बाब जोडणारी आहे, ती म्हणजे या प्रदेशांमध्ये होणारा नारळाच्या पदार्थांचा वापर. नारळ व खोबरे तेलात असलेले गुणधर्म कोरोनावर प्रतिबंध करण्यात प्रभावी ठरत असल्याचा प्राथमिक अंदाज संशोधकांनी व्यक्‍त केला आहे.
यासंदर्भात वैद्य विक्रांत जाधव म्हणाले, की फिलीपिन्स व अमेरीका येथील डॉक्‍टर असलेल्या संशोधकांनी फेब्रुवारीमध्येच यासंदर्भात संशोधन सुरू केले होते. फिलीपिन्स कौन्सिल ऑन हेल्थ रिसर्च डिपार्टमेंट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्‍नॉलॉजीचे कार्यकारी संचालक डॉ. जामे मोंटोया, मनीला युनिव्हर्सिटीचे डॉ. फॅबियन डॅरीट आणि अमेरीकेतील डॉ. मॅरी न्युपोर्ट यांनी आहार्य पदार्थ घेऊन संशोधन करतांना, कोकोनट ऑइन अर्थात खोबरे तेल हा घटक घेऊन संशोधन केले आहे. यात त्यांनी नोंदविलेल्या निरीक्षणांनुसार नारळात आढळणाऱ्या घटकांमुळे कोरोना नियंत्रणात येऊ शकतो. यात प्रामुख्याने लॉरीक ऍसिड अधिक प्रमाणात असते. एमसीटी व मोनोलॉरीन अन्य घटकांमुळे मानवी शरीरात कोरोनाच्या विषाणूंचा फैलाव रोखण्यास मदत होते. ड्यूक नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर यांच्या सहकार्याने हे संशोधन सध्या सुरू आहे. यासंदर्भात अधिक संशोधनानंतरच सविस्तर बाबी स्पष्ट होणार आहेत. परंतु जर या संशोधनात तथ्य असेल, तर भारतीयांसाठी ही दिलासादायक अशी गोष्ट ठरणार आहे.

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी
भारतीय धर्मशास्त्रात नारळाला श्रीफळ म्हणून संबोधले आहे. तसेच विषाणूंपासून संरक्षक म्हणून आहारात विविध प्रकारांनी नारळाचा समावेश राहिलेला आहे. यासंदर्भातील संशोधनात प्राथमिक स्तरावर नारळात आढळणारे लॉरीक ऍसिड, एमसीटी आणि मोनोलॉरीन हे घटक कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रभावी ठरत असल्याचे निदर्शनात आले आहे.- वैद्य विक्रांत जाधव.

हेही वाचा >  "आता मुख्यालयीच थांबा.. अन्यथा.." सरकारी बाबूंकडुनच नागरिकांना भीती