हुडहुडी... गारठा कायम...पारा वाढला..! 

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर नववर्षाचे स्वागत मोसमातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. बुधवारी (ता. 1) 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले होते. यात आज किचिंत वाढ झाली असून, किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असली तरी वातावरणात गारठा आहे.

नाशिक : नववर्षाचे स्वागत कडाक्‍याच्या थंडीत झाल्यानंतर गुरुवारी (ता. 2) मात्र किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली. परंतु वातावरणात गारठा कायम आहे. नाशिकचे किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. दरम्यान, विदर्भात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली असून, आणखी दोन दिवस पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

नाशिकच्या किमान तापमानात लक्षणीय घट

गेल्या आठवडाभरापासून नाशिकच्या किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. तर नववर्षाचे स्वागत मोसमातील आतापर्यंतच्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. बुधवारी (ता. 1) 10.3 अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदले गेले होते. यात आज किचिंत वाढ झाली असून, किमान तापमान 11.6 अंश सेल्सिअस इतके नोंदले गेले. किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली असली तरी वातावरणात गारठा आहे. सायंकाळी बोचऱ्या गार वाऱ्यांनी आणखीच गारवा जाणवत होता. राज्यात नीचांकी तापमानाची नोंद चंद्रपूर येथे 10.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. तर विदर्भात गारपिटीसह पावसाने हजेरी लावली आहे. दोन दिवसांनंतर मात्र राज्यातील हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  

हेही वाचा > रात्रीचा 'तिचा' प्रवास...उद्यानात दारूच्या पार्ट्या रंगताना 'ते' तिला बघतात..अन् मग...

हेही वाचा > गाडीला फक्त पिक-अप गाडीचा कट लागला...राग होताच त्याच्या मनात..त्यानंतर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold increased in Nashik marathi news