गाडीला फक्त पिक-अप गाडीचा कट लागला...राग होताच त्याच्या मनात..त्यानंतर

friend beat.jpg
friend beat.jpg

नाशिक : कोचरगाव (ता. दिंडोरी) शिवारातील वागदर मळा येथे मागील भांडणाची कुरापत काढून बारा जणांच्या जमावाने एकाचा खून केला. शिवाजी सुखदेव पारधी (वय 25) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. 1) रात्री अकराच्या सुमारास घडली. संशयितांनी छातीत चॉपर खुपसले व लाकडी दांडक्‍याने डोक्‍यावर वार केल्याने शिवाजी पारधी याचा जागीच मृत्यू झाला. 

असा घडला प्रकार
गणेश विसर्जनावेळी शिवाजी पारधी कोचरगाव येथील देवीची मूर्ती ठेवलेली पिक-अप गाडी चालवत होता. संशयित सोमनाथ टोंगारे याच्या गाडीला पिक-अप गाडीचा कट लागला. यामुळे त्यांच्यात वाद झाला. याबाबत दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल आहे. बुधवारी रात्री संशयित सोमनाथ टोंगारे, सागर लिलके, दीपक लिलके, उत्तम लिलके, भागवत लिलके, धर्मराज लिलके, प्रकाश लिलके, लालू लिलके, लक्ष्मण लिलके, मनोज लिलके, भगवान लिलके, बाळू लिलके यांनी संगनमताने शिवाजी पारधी याच्यावर हल्ला चढवला. चॉपर छातीत खुपसला व लाकडी दांडक्‍याने केलेल्या मारहाणीमुळे शिवाजी पारधीचा जागीच मृत्यू झाला. याबाबत राजेंद्र पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला असून, संशयितांना अटक करण्यात आली. उमराळे बुद्रुक दूरक्षेत्राचे पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com