
मास्क न वापरणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना अर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
नाशिक : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने नाशिक शहरात विनामास्क फिरणाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कारवाईचा दंडुका उगारला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये आली आहे.
सर्वसामान्यांना अर्थिक झळ
तीन दिवसांपासून २०० रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मात्र, सोमवार (ता. २२)पासून मास्क न वापरणाऱ्यांकडून एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे. यामुळे सर्वसामान्यांना अर्थिक झळ सोसावी लागणार आहे. शहरातील गंगापूर रोड, शालिमार, मेन रोड, महात्मा गांधी रस्ता येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तोंडाला मास्क न लावल्याने ३१ नागरिकांकडून २०० रुपयांप्रमाणे दंड आकारून कारवाई करण्यात आली.
हेही वाचा - रक्षेसाठी राखी बांधलेले हातच रक्ताने माखलेले! रक्षणकर्ता भाऊच बनला बहिणीसाठी काळ
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिका ॲक्शन मोडमध्ये
एकूण सहा हजार २०० रुपयांच दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई नाशिक पश्चिम विभागाचे स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड, अशोक साळवे, श्रीकृष्ण पांडे, सोमनाथ वाघ यांनी केली.
हेही वाचा - थरारक! सिटबेल्टमुळे पेटलेल्या गाडीत अडकला चालक; नातेवाईकांना घातपाताचा संशय