खासगी रुग्णालयांच्या अवाजवी बिलांवरून जिल्हाधिकारी इन ऍक्‍शन मोड..! दिले हे आदेश

hospitals 123.jpg
hospitals 123.jpg

नाशिक ः जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर भीतीपोटी खासगी रुग्णालये गाठणाऱ्या रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिले मिळत असल्याच्या तक्रारीवरून महापालिकेने थेट कारवाईचा पवित्रा घेतला. आता ग्रामीण भागातही प्राप्त तक्रारीनुसार जिल्हाधिकारी सूरज मांढरे ऍक्‍शन मोडमध्ये आले आहेत.

जिल्हाधिकारी ऍक्‍शन मोड मध्ये  

जूनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिकेच्या कोविड सेंटर फुल झाल्याने रुग्णांनी खासगी रुग्णालयांची वाट धरली. परंतु कोरोना भीतीचा लाभ उठवत रुग्णालय प्रशासनाकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारली जात असल्याचे प्रकार समोर आले. रुग्णालयांच्या दर्शनी भागावर शासन निर्देशानुसार उपचाराची दरसूची लावण्याचे आदेश दिले आहेत. तक्रारी आल्यास तत्काळ दखल घेऊन कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

रुग्णांकडून लाखो रुपये वसूल

महात्मा फुले जीवनदायिनी योजनेतून 60 हजार रुपयांपर्यंत बिल होत असताना या योजनेत सहभागी न झालेल्या रुग्णांकडून लाखो रुपये वसूल केले जात असल्याचा प्रकार समोर आला. महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी महापालिका प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर रुग्णालयांच्या दर्शनी भागावर शासन निर्देशानुसार दरपत्रक लावण्याचा निर्णय घेण्यात आला, तर रुग्णालयांमध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर लेखापरीक्षकही नियुक्त करून बिले तपासण्याचा निर्णय घेण्यात आला.शहराबरोबरच ग्रामीण भागातही जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी रुग्णालयांना स्पष्ट सूचना देताना लूट न करण्याचा इशारा दिला. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दरसूची लावावी, अन्यथा रुग्णालयांची बिले तपासण्याचा इशारा दिला आहे. 

शहानिशा कागदपत्रांची पडताळणी करून
कोरोना रुग्णांवर उपचार करताना शासनाने उपचाराचे दर निश्‍चित करून दिले असून, त्या संदर्भात अध्यादेश काढले आहेत. शासन निर्णयाची अंमलबजावणी योग्य प्रकारे होत आहे की नाही याची शहानिशा कागदपत्रांची पडताळणी करून केली जाणार आहे. -सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक 


छावा जनक्रांतीचे आंदोलन 
खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त बिले आकारली जात असल्याने कारवाई व्हावी, या मागणीसाठी छावा जनक्रांती संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करून निवेदन देण्यात आले. महात्मानगर येथील सिक्‍स सिग्मा हॉस्पिटलचा उल्लेख करताना रुग्णालय व्यवस्थापनाने कोरोना रुग्ण व नातेवाइकांशी गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला. या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्याचे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com