कॉल सेंटरकडे खासगी रुग्णालयांविरोधात तक्रारी दाखल..पहिल्याच दिवशी चक्क 'इतक्या' तक्रारी

विक्रांत मते
शुक्रवार, 31 जुलै 2020

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यात रुग्णालयात खाटा न मिळणे, जादा बिल आकारणे आदी मुख्य तक्ररींचा समावेश होता. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भातील आढावा घेतला. त्यावेळी रुग्णांच्या तक्रारसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या.​

नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून विविध प्रकारच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यात रुग्णालयात खाटा न मिळणे, जादा बिल आकारणे आदी मुख्य तक्ररींचा समावेश होता. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोनासंदर्भातील आढावा घेतला. त्यावेळी रुग्णांच्या तक्रारसाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महापालिकेने सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम कार्यान्वित केली आहे.

कॉल सेंटरकडे खासगी रुग्णालयांविरोधात तक्रारी

कोरोनाबाधितांना तत्काळ खाटा उपलब्ध होण्याबरोबरच खासगी रुग्णालयासंदर्भात तक्रार करण्यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या कॉल सेंटरकडे गुरुवारी पहिल्याच दिवशी २८ जणांनी माहिती घेतली. यात दहा तक्रारी रुग्णालयाकडून आकारलेल्या जादा बिलासंदर्भात असून, त्या तक्रारी दर नियंत्रण समितीकडे पाठविल्या आहेत.

हेही वाचा > झोळीत असतानाच नियतीने हिरावले पितृछत्र...आज त्याच लेकीच्या यशाने माऊलीच्या होते डोळ्यात आनंदाश्रू

पहिल्याच दिवशी हेल्पलाईनवर २८ जणांनी माहिती घेतली

त्याचबरोबर १४ खासगी रुग्णालयातील शंभर टक्के खाटा म्हणजेच ६३० खाटा आरक्षित केल्या. २५ खासगी रुग्णालयात ५११ खाटा अंशतः आरक्षित करण्यात आल्या. पहिल्याच दिवशी हेल्पलाईनवर २८ जणांनी माहिती घेतली. यात तिघांनी रुग्णालयाच्या खाटासंदर्भात माहिती विचारली. तिघांनी लॅबसंदर्भात तक्रारी केल्या आहेत. रुग्णालयाकडून आकारलेल्या बिलासंदर्भात दहा जणांनी तक्रारी केल्या. महापौर सतीश कुलकर्णी, सभागृहनेते सतीश सोनवणे यांनी कॉल सेंटरला भेट देऊन माहिती घेतली. 

हेही वाचा > VIDEO : आश्चर्यच! एकीकडे रुग्णांसाठी खाटांची वणवण...अन् दुसरीकडे आयसोलेशन कोचेसचा प्रशासनाला विसर?

रिपोर्ट - विक्रांत मते

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: complaints against private hospitals to call center nashik marathi news