''स्मार्टसिटी कंपनीच्या अनागोंदी कारभाराला चाप लावावा लागेल''

विक्रांत मते
Saturday, 7 November 2020

यापूर्वी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही स्मार्टसिटी कंपनीची पोलखोल केली होती. महापौर कुलकर्णी यांनी स्मार्टसिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार करताना थविल यांच्या बदलीची मागणी केली होती.  

नाशिक : स्मार्टसिटी कंपनीमार्फत शहरात सुरू असलेल्या प्रकल्पांवरून सत्ताधारी भारतीय जनता पक्षासह विरोधी पक्षांनी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांना धारेवर धरत शासनाकडे तक्रार केली. आता थेट पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही या प्रकरणात लक्ष घालणार असल्याचे स्पष्ट केले. पालकमंत्री भुजबळ यांच्याशी शुक्रवारी (ता. ६) माध्यम प्रतिनिधींनी संवाद साधला. 

अनागोंदी कारभाराला चाप लावावा लागेल...

यावेळी स्मार्टसिटी कंपनी व कंपनीचे सीईओ थविल यांच्याबाबत तक्रारींचा मुद्दा मांडला. या वेळी भुजबळ म्हणाले, की कंपनीच्या सीईओविरोधात अनेक तक्रारी आहेत. आता खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनी तक्रार केल्याने या प्रकरणात काही तरी तथ्य असेल, त्यामुळे स्मार्टसिटी कंपनीच्या अनागोंदी कारभाराला चाप लावावा लागेल. यापूर्वी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनीही स्मार्टसिटी कंपनीची पोलखोल केली होती. महापौर कुलकर्णी यांनी स्मार्टसिटी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांच्याकडे तक्रार करताना थविल यांच्या बदलीची मागणी केली होती.  

हेही वाचा > शेडनेट पंजाच्या सहाय्याने फाडून आत शिरण्यात बिबट्या अयशस्वी; तरीही डाव साधलाच

हेही वाचा > समाजकंटकाचेच षड्यंत्र! वाळलेले कांदारोप बघून शेतकऱ्याला धक्काच; अखेर संशय खरा ठरला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In complaints against Thavil Will pay attention - Bhujbal nashik marathi news