''जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची कामे मार्गी लावा'' - गुलाबराव पाटील

0gulabrao_20patil_0.jpg
0gulabrao_20patil_0.jpg

नाशिक : (लासलगाव) सोळा गाव पाणीपुरवठा योजनेच्या वारंवार होणाऱ्या विस्कळितपणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषनंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रश्‍नी पुढाकर घेत पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत बैठक घेत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या समस्या मांडल्या. या वेळी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसह सर्व पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. 

१६ गाव पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्तीचाही आशावाद

पालकमंत्री व पाणीपुरवठामंत्री यांच्या बैठकीमुळे लासलगावसह विंचूर १६ गाव पाणीपुरवठा योजनेची दुरुस्ती होईल, असा आशावाद आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील लासलगाव-विंचूर १६ गावे, धूळगाव (भिंगारे, ता. येवला) व १७ गावे, राजापूर व ४० गावे, नांदूरमध्यमेश्वर, खडक माळेगाव व सारोळे खु. (ता. निफाड) या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या समस्येसंदर्भात मंगळवारी (ता. १३) पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. या वेळी श्री. भुजबळ यांनी लासलगाव-विंचूर हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असून, येथील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे तेथील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला मंजुरी देण्यात यावी. भिंगारे (ता. येवला)सह १५ गांवे, राजापूर व ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा नव्याने प्रस्ताव मान्य करावा. नांदू मध्यमेश्वर, खडक माळेगाव व सारोळे खु. (ता. निफाड) येथील पाणीपुरवठा योजनांचा जलजीवन मिशन कृती आराखड्यात समावेश करावा. जिल्ह्यातील गावांच्या पाणीपुरवठा योजनांची गरजेनुसार कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत, अशी विनंती केली. 

अधिकाऱ्यांना दिल्या सूचना

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांचा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर करावा, अशा सूचना या वेळी केल्या. या बैठकीस पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, तसेच लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष जयदत्त होळकर, माजी उपसरपंच संतोष ब्रह्मेचा, पाणीपुरवठा योजनेचे सचिव शरद पाटील, डॉ. विकास चांदर, पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालय व नाशिक जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com