esakal | "जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची कामे मार्गी लावा" - गुलाबराव पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

Complete water supply scheme in the district says gulabrao patil nashik marathi newsComplete water supply scheme in the district says gulabrao patil nashik marathi news

प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या समस्येसंदर्भात आज (ता.१३) पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. 

"जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेची कामे मार्गी लावा" - गुलाबराव पाटील

sakal_logo
By
अरुण खंगाळ

नाशिक/लासलगांव : सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचा वारंवार होणाऱ्या विस्कळीतपणामुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या असंतोषनंतर अन्न, नागरी पुरवठा व ग्राहकसंरक्षण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रश्‍नी पुढाकर घेत पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमवेत बैठक घेत जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या समस्या मांडल्या. यावेळी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेसह सर्व पाणीपुरवठा योजनेचे प्रलंबित कामे मार्गी लावण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री यांच्या बैठकीमुळे लासलगावसह विंचुर १६ गाव पाणीपुरवठा योजनेची दुरूस्ती होईल अशा आशावाद आता निर्माण झाला आहे. 

योजनांच्या समस्येसंदर्भात मंत्रालयात बैठक

जिल्ह्यातील लासलगांव-विंचूर १६ गावे, धुळगाव (भिंगारे ता. येवला) व १७ गावे, राजापूर व ४० गावे, नांदूरमध्यमेश्वर, खडक माळेगांव व सारोळे खु. (ता.निफाड) या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांच्या समस्येसंदर्भात आज (ता.१३) पालकमंत्री छगन भुजबळ, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी भुजबळ यांनी लासलगांव-विंचूर हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव असून येथील पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे महत्वाचे आहे. त्यामुळे तेथील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या दुरुस्तीच्या कामाला मंजूरी देण्यात यावी. ,भिंगारे, ता. येवला सह १५ गांवे,राजापूर व ४० गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा नव्याने प्रस्ताव मान्य करावा. नांदूर मध्यमेश्वर, खडकमाळेगांव व सारोळे खु. ता निफाड येथील पाणी पुरवठा योजनांचा जलजीवन मिशन कृती आराखडय़ात समावेश करावा. जिल्ह्य़ातील गावांच्या पाणी पुरवठा योजनांची गरजेनुसार कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करावीत अशी विनंती केली. 

हेही वाचा > हाऊज द जोश! जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाशिक जिल्ह्य़ातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि जिल्ह्यातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनांचा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा सादर करावा अशा सूचना यावेळी केल्या. या बैठकीस पाणी पुरवठा विभागाचे अप्पर मुख्य सचिव संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर, तसेच लासलगाव सोळा गाव पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष जयदत्त होळकर, माजी उपसरपंच संतोष ब्रम्हेचा , पाणी पुरवठा योजनेचे सचिव शरद पाटील, डॉ. विकास चांदर, पाणीपुरवठा विभागाचे मंत्रालय व नाशिक जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा

संपादन - रोहित कणसे