'आयटीआय'च्‍या पहिल्‍या फेरीत ३०५ विद्यार्थ्यांची प्रवेश निश्चिती; वाचा सविस्तर

अरुण मलाणी
Thursday, 17 September 2020

सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध ट्रेडसाठी प्रवेशासाठी मंगळवार (ता. १५) सायंकाळपर्यंत मुदत होती. पहिल्‍या फेरीत ३०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्‍या प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

नाशिक : सातपूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) विविध ट्रेडसाठी प्रवेशासाठी मंगळवार (ता. १५) सायंकाळपर्यंत मुदत होती. पहिल्‍या फेरीत ३०५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्‍चित केले आहेत. आता दुसऱ्या फेरीच्‍या प्रक्रियेकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

शिक्षण संचालनालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गेल्या महिन्यापासून आयटीआयच्या एक हजार ३३२ जागांसाठी ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वेळापत्रकात बदल केला होता. प्रवेश प्रक्रियेंतर्गत पहिल्‍या फेरीसाठी एक हजार १३० विद्यार्थ्यांची निवड केली होती. निर्धारित मुदतीत एक दिवसाची वाढ करूनही ३०५ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्‍चित केले आहेत. आता प्रवेशप्रक्रियेच्‍या पुढील टप्प्‍यात रिक्‍त जागांसाठी दुसरी निवड यादी गुरुवारी (ता. १७) जाहीर होणार आहे. शुक्रवार (ता. १८)पासून २२ सप्टेबरपर्यंत प्रवेशाची मुदत असेल.

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confirmation of admission of 305 students in the first round of ITI nashik marathi news