वीज कंपनीच्या कार्यालयात गोंधळ..ग्राहकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

वीजबिल भरण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात ग्राहकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. अनेक ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांना बिलांबाबत विचारणा करून स्पष्टीकरण मागितले.

नाशिक रोड : वीजबिल भरण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात ग्राहकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. अनेक ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांना बिलांबाबत विचारणा करून स्पष्टीकरण मागितले.

अधिकाऱ्यांची उडाली चांगलीच धांदल

वीज भवन येथे महावितरणच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना वाढीव वीजबिलांबाबत जाब विचारून धारेवर धरण्यात आले. याबाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करू, असे आश्‍वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. वीजबिल भरण्यासाठी कंपनीच्या कार्यालयात ग्राहकांनी मोठ्या रांगा लावल्या होत्या. अनेक ग्राहकांनी संबंधित अधिकाऱ्यांना बिलांबाबत विचारणा करून स्पष्टीकरण मागितले. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. वीजबिल कमी करण्याबाबत याअगोदरही प्रभाग समितीचे सभापती विशाल संगमनेरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसे यांनी मुख्य वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. यावर आतापर्यंत कुठलाही ठोस निर्णय झाला नाही. 

हेही वाचा > धक्कादायक खुलासा! महिन्याला दीडशे महिला अचानक होताएत बेपत्ता? काय आहे प्रकार?

ग्राहकांकडून आरोप

नाशिक रोडला वीज भवन येथे महावितरणच्या कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना वाढीव वीजबिलांबाबत जाब विचारून धारेवर धरण्यात आले. रीडिंगप्रमाणे वीजबिले आकारली नाहीत, असा आरोप ग्राहकांनी केला. लॉकडाउन काळात वीजग्राहकांना एकाच वेळी मोठ्या रकमेची बिले दिल्याने ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. वीजबिले कमी करून मिळण्यासाठी वीज भवन येथील केंद्रावर ग्राहकांनी सोमवारी (ता. 29) एकच गर्दी केली. परिणामी गोंधळ निर्माण झाला होता. रीडिंगप्रमाणे वीजबिले आकारली नाहीत, असा आरोप ग्राहकांनी केला. 

हेही वाचा > धक्कादायक! हॉटेलमध्ये पोलिसांची एंट्री होताच सुरु झाली पळापळ...नेमकं काय घडले?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in the power company's office to reduce bills