
नाशिक : तब्बल ४७ कोटींपर्यंत पोचलेल्या वादग्रस्त पेस्ट कंट्रोल ठेक्याला प्रशासनाकडून फाइल बंद करण्याचा निर्णय जवळजवळ झाल्याचे शुक्रवारी (ता. ११) स्पष्ट झाले. स्थायी समितीमध्ये विषय चर्चेला आला; परंतु प्रशासनाकडून प्रस्ताव न ठेवला गेल्याने मे. दिग्विजयसाठी सकारात्मक वातावरण तयार करण्याचा काही सदस्यांचा प्रयत्न हाणून पडला आहे. तरीही पुढील स्थायी समितीच्या सभेत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या.
निर्णय आयुक्तांच्या कोर्टात
पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याची मूळ किंमत १९ कोटींची असताना नवीन प्रस्तावात तब्बल ४७ कोटींपर्यंत ठेका पोचविण्यात आला. विशेष म्हणजे, वर्षभरापासून ज्या ठेकेदाराला मुदतवाढ दिली जात आहे त्या मे. दिग्विजय एन्टरप्राइजेससाठी प्रयत्न होत आहेत. त्यापूर्वी निविदा समितीने मे. दिग्विजयसंदर्भात आक्षेप घेताना निविदा फेटाळली. त्यात अनेक आक्षेपार्ह मुद्दे आढळले. दिग्विजय एन्टरप्राइजेसकडे अनुभव नसताना काम दिले जात आहे. मालेगाव महापालिका हद्दीत गुन्हा दाखल आहे. असे अनेक आक्षेप असताना दिग्विजयसाठी सर्वपक्षीय नगरसेवक सरसावल्याने ठेका वादात सापडला. तरीही वारंवार स्थायी समितीवर पेस्ट कंट्रोलचा विषय चर्चेला आणला जात असल्याने संशय वाढला.
पावसाळा संपल्याने निर्णय लांबणीवर
निविदाप्रक्रियेत ज्या तीन कंपन्यांनी सहभाग घेतला, त्यातील दोन कंपन्यांना निविदेतील अनामत रक्कम परत करण्यात आल्याने संशय अधिक बळावला. त्यापार्श्वभूमीवर गरज नसताना आज स्थायी समितीची बैठक बोलाविण्यात आली. कोविडचे निमित्त साधून पेस्ट कंट्रोलचा विषय रेटण्याचा प्रकार होत होता. परंतु फाइल आयुक्तांकडे असल्याने प्रस्ताव ठेवता आला नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. पावसाळ्यात साथीचे आजार व डासांची उत्पत्ती होत असल्याने याच काळात धूर व औषध फवारणीची गरज भासते. आता पावसाळा संपत असल्याने पेस्ट कंट्रोलची गरज नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आल्याचे समजते. त्यामुळे याबाबतचा निर्णय लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे.
संपादन - किशोरी वाघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.