VIDEO : "..तर शांतता भंग करणं आम्हालाही येतं" मालेगावच्या एमआयएम आमदारांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल..

mohammad ismail.jpg
mohammad ismail.jpg

नाशिक / मालेगाव :देशाची राजधानी दिल्लीमध्ये  सीएए समर्थक आणि विरोधक आमनेसामने आल्याने गेल्या आठवडाभरापासून तणावाचे वातावरण आहे. त्याचे पडसाद दगडफेक, जाळपोळ यामध्ये उमटले आहेत.अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील मालेगाव येथील एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माइल यांचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. वारिस पठाण यांच्या विधानानंतर मोहम्मद इस्माइल यांनी केलेल्या विधानाचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

मोहम्मद इस्माइल यांनी केले हे विधान...

या व्हिडीओत मोहम्मद इस्माइल म्हणतात की, शहरात गोळीबार झाला तरी गुन्हा दाखल का केला जात नाही? शहरातील लोकं मूर्ख आहेत असं समजता का? असा सवाल त्यांनी पोलीस विभागाला विचारला आहे. तसेच शहरात काय परिस्थिती आहे याची आम्हाला कल्पना आहे, शहरात शांतता राहावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो, शहरावर संकट येतं तेव्हा आम्ही पोलिसांच्या आधी पोहचतो, लोकांना शांत करतो, आम्ही शांतता ठेवतो तसेच जर आमच्या अंगावर कोणी येत असेल शांतात भंग करणं हेदेखील आम्हाला येतं. आम्ही हातात बांगड्या भरल्या नाहीत असा इशारा एमआयएमचे आमदार मोहम्मद इस्माइल यांनी दिला आहे. त्याचसोबत हा आमचा प्रामाणिकपणा आहे म्हणून शांत आहोत. २००९ च्या निवडणुकीत हरल्यानंतर लोकांना मारहाण करण्यात आली, कारखान्यांना आग लावली गेली. लोकांकडून पैसे लुटले, २०१९ च्या निवडणुकीनंतरही असाच प्रकार सुरु आहे, शहरात गुंडगिरी वाढली आहे असं म्हटलं आहे. 

 मोहम्मद इस्माइल यांचं व्हिडीओवर स्पष्टीकरण

 या व्हिडीओवर स्पष्टीकरण देताना मोहम्मद इस्माइल यांनी सांगितले की, मी केलेले वक्तव्य महाराष्ट्राशी अथवा देशाशी निगडीत नाही तर शहरासंदर्भात आहे. गोळीबारीची घटना आमच्या समर्थकांच्या घराजवळ करण्यात आली. याबाबत मी शांतता राखण्यासाठी पोलिसांची मदत करतो पण अशाप्रकाराने शांतता भंग होऊ शकते असं स्पष्टीकरण दिलं आहे. 

"आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो" वारिस पठाण यांच्या विधानामुळे एमआयएम अडचणीत

यापूर्वी वारिस पठाण यांच्या विधानामुळे एमआयएम अडचणीत आली होती. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारीला कर्नाटकातल्या गुलबर्गामध्ये भाषण केले होते. या सभेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळवावे लागेल. जी गोष्ट मागून मिळत नसेल, ती हिसकावून घ्यावी लागेल. आता ती वेळ आलेली आहे. आम्ही माता, भगिनींना पुढे करतो, असे ते म्हणतात. आता तर फक्त सिंहिणी बाहेर पडल्या आहेत आणि तरीही तुम्हाला घाम फुटला आहे. आम्हीदेखील त्यांच्या सोबत बाहेर पडलो, तर काय होईल याचा विचार करा. आम्ही १५ कोटी आहोत. मात्र १०० कोटींवर भारी पडू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा,असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com