धोका वाढतोय..प्रशासन हादरले...खाटांची संख्याही वाढवणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. मेअखेरीस मात्र रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. जून महिन्यात कोरोनावाढीचा विस्फोट होऊन 500पर्यंत रुग्ण पोचत असल्याने महापालिका प्रशासन हादरले.

नाशिक : एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. मेअखेरीस मात्र रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. जून महिन्यात कोरोनावाढीचा विस्फोट होऊन 500पर्यंत रुग्ण पोचत असल्याने महापालिका प्रशासन हादरले.

कोविड सेंटरमधील खाटांची संख्या दुप्पट

जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने पुन्हा एकदा नव्याने आजाराला तोंड देण्यासाठी कंबर कसली असून, त्याचाच भाग म्हणून कोविड सेंटरमधील खाटांची संख्या दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. सद्यःस्थितीत 375 खाटांची संख्या आहे. आता चारशे खाटांची वाढ केली जाणार आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील समाजकल्याण वसतिगृहाच्या तीन इमारती ताब्यात घेऊन तेथे 100 खाटांवरून 300 पर्यंत खाटा वाढविल्या जाणार आहेत. 

रुग्णांची संख्या सातत्याने वाढली

एप्रिल महिन्यात नाशिकमध्ये पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या वाढत गेली. मे महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती नियंत्रणात होती. मेअखेरीस मात्र रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. जून महिन्यात कोरोनावाढीचा विस्फोट होऊन 500पर्यंत रुग्ण पोचत असल्याने महापालिका प्रशासन हादरले. सध्या कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी कथडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय कोरोना सेंटर म्हणून घोषित केले आहे. तेथे शंभर खाटांची व्यवस्था होती. तपोवनात 30, नाशिक रोडच्या फायर ब्रिगेडच्या इमारतीत 70, विल्होळी येथील ट्रेनिंग सेंटरच्या इमारतीत 60 खाटांचे, तर समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहाच्या इमारतीत 100 खाटांचे कोविड सेंटर उभारले होते. मात्र, रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटरमधील खाटांची संख्या दुप्पट केली जाणार आहे. 

हेही वाचा > "चमत्कार झाला..! मालेगावात नेमके काय घडले?" सर्वत्र आश्चर्य..!

अतिरिक्त खाटांची सोय 
समाजकल्याण विभागाच्या इमारतीत 100 खाटांची व्यवस्था आहे. आता तेथील तिन्ही इमारती ताब्यात घेतल्या असून, 200 अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली आहे. तपोवन विलगीकरण कक्षात 15, डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात 50, विल्होळी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये 40, नाशिक रोडच्या फायर ब्रिगेडच्या इमारतीत 30 अतिरिक्त खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. मेरी येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे वसतिगृह ताब्यात घेतले जाणार असून, तेथे 100 खाटांचे कोविड सेंटर उभारण्याची तयारी महापालिकेने केली आहे.  

हेही वाचा >  नाशिकमधील 'हे' गाव झालयं चक्क मुंबईतील धारावी.. कोणाचा कुठे ताळमेळ बसेना


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corana centre bed double due to increase patients nashik marathi news