विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना कोरोनाची लागण

दिगंबर पाटोळे
Saturday, 26 September 2020

"माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे. तसेच, मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे," असे झिरवाळ यांनी सांगितले आहे.

नाशिक / वणी : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना झाल्याने नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशन विधानसभा अध्यक्ष पदाचा कारभार सांभाळावा लागलेल्या उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

नरहरी झिरवाळ यांनाही कोरोनाची बाधा..

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे विधानभवनातील कार्यालयातील एक कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने कार्यालय बंद ठेवण्यात येऊन झिरवाळ यांच्यासह कार्यालयातील अधिकारी कर्मचारी क्वारंटाईन करत त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात झिरवाळ यांचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला असून त्यांना नाशिक शहरातील खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा > भीषण! ३५ हून अधिक मजुरांचा तो कानठळ्या बसविणारा आवाज; महामार्गावरील थरार

मी लवकरच कोरोनावर मात करेन

दरम्यान, माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन झिरवाळ यांनी केले आहे. तसेच, मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सेवेत दाखल होईन. माझी तब्येत उत्तम आहे, असे झिरवाळ यांनी सांगितले आहे.

हेही वाचा > ३०हून अधिक कोविड रुग्णालये नाशिक शहरात रातोरात उभी! प्रशासनाचा खुलासा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona affected Narhari Jirwal vice-president of Legislative Assembly nashik marathi news