कोरोना नियंत्रणामुळे कोविड सेंटर रिकामे; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर  

विक्रांत मते
Saturday, 14 November 2020

जून महिन्यापासून कोरोना संसर्गाचा उंचावलेला आलेख झपाट्याने उतरणीला लागला असून, सद्यःस्थितीत कोविड सेंटरमध्ये अवघे दहा टक्के रुग्ण असून, कोरोना रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोचला

नाशिक : जून महिन्यापासून कोरोना संसर्गाचा उंचावलेला आलेख झपाट्याने उतरणीला लागला असून, सद्यःस्थितीत कोविड सेंटरमध्ये अवघे दहा टक्के रुग्ण असून, कोरोना रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर पोचला आहे. मार्च महिन्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर महापालिकेने शहरात डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, नवीन बिटको रुग्णालय, समाजकल्याण वसतिगृह व मेरी येथे कोविड सेंटरची उभारणी केली.

अवघ्या दहा टक्के बेडवर रुग्ण, रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर 

क्रेडाई या बांधकाम व्यावसायिकांच्या सहकार्याने ठक्कर डोम येथे साडेतीनशे खाटांचे सेंटर उभारण्यात आले. महापालिकेच्या कोविड सेंटरसह खासगी रुग्णालये मिळून चार हजार ३४९ बेड उपलब्ध करून दिले. ऑक्टोबर महिन्यात कोरोना संसर्ग आवाक्यात आल्याने सध्या ६१३ बेडवरच रुग्ण आहेत. नव्वद टक्के बेड रिकामे आहेत. 

 

हेही वाचा > मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

रिकव्हरी रेट वाढला 
कोरोना संसर्गाचा आलेख खाली आला असून, रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. शहरात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असली तरी दिवाळीनिमित्त बाजारात खरेदीदारांची गर्दी वाढल्याने कोरोना संसर्गाचा आलेख उंचावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन आयुक्त कैलास जाधव यांनी केले.  

हेही वाचा > मित्राला सोडायला गेलेल्या दोघांचा दुर्दैवी अंत; ऐन दिवाळीत कुटुंबांवर दु:खाचा डोंगर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona control empties at covid center nashik marathi news