#21daylockdown : जीवनावश्यक,अत्यावश्यक व वैद्यकीय वाहतुकीसाठी मदत कक्ष कार्यान्वित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शहरातील सर्व नागरीकांना नाशिक शहरांतर्गत सदर संचारबंदीच्या काळात दवाखाना व वैद्यकीय सारख्या अत्यावश्यक सेवेकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे, अशा नागरीकांनी त्यांचे नाव, मोबाईल नंबर, अडचणीचे स्वरुप, कोठुन कोठे जाणार, कोणत्या तारखेच जाणार आहे, वार, वेळ व ठिकाण सोबत 1 स्वतःचे ओळखपत्र आधारकार्ड / वाहन परवाना / मतदान कार्ड  ही माहिती तसेच ज्या दवाखान्यामध्ये जायचे आहे त्याची माहिती,  पोलीस नियंत्रण कक्ष येथील व्हाट्स ॲप मोबाईल नंबर्सवर पाठवावी. तसेच तातडीच्या वैदयकीय सुविधा घेण्याकरीता 108 या सरकारी ॲम्बुलन्सचा सेवेचा देखील लाभ घेण्यात यावा. 

नाशिक : नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या हददीतील रस्त्यांवर सर्व प्रकारच्या वाहनांना 23 मार्चपासूनच प्रवास व वाहतूक करण्यात मनाई करण्यात आलेली आहे. जीवनावश्यक व इतर आवश्यक सेवा बजावताना  त्रास होवू नये, यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत 'कोरोना पोलीस मदत कक्ष’कार्यान्वित करण्यात आला आहे. 

नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘कोरोना पोलीस मदत कक्ष'

नाशिक शहरात कोरोना 'कोव्हीड 19' या व्हायरसचा संसर्ग टाळण्याकरीता संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. सीआरपीसी कलम 144 ( 1 ), ( 3 ) अन्वये वाहन वापरास व वाहतूकीस मनाई आहे. त्यामुळे आरोग्य विभाग , पोलीस, अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तू तसेच आपत्ती निवारण व्यवस्थापनाशी निगडीत काम करणारे अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रवास करण्यास परवानगी आवश्यक आहे . त्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयामार्फत ‘कोरोना पोलीस मदत कक्ष' कार्यान्वित झालेला आहे.

परवानगी घेणे आवश्यक..

तसेच शहरातील सर्व नागरीकांना नाशिक शहरांतर्गत सदर संचारबंदीच्या काळात दवाखाना व वैद्यकीय सारख्या अत्यावश्यक सेवेकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता आहे, अशा नागरीकांनी त्यांचे नाव, मोबाईल नंबर, अडचणीचे स्वरुप, कोठुन कोठे जाणार, कोणत्या तारखेच जाणार आहे, वार, वेळ व ठिकाण सोबत 1 स्वतःचे ओळखपत्र आधारकार्ड / वाहन परवाना / मतदान कार्ड  ही माहिती तसेच ज्या दवाखान्यामध्ये जायचे आहे त्याची माहिती,  पोलीस नियंत्रण कक्ष येथील व्हाट्स ॲप मोबाईल नंबर्सवर पाठवावी. तसेच तातडीच्या वैदयकीय सुविधा घेण्याकरीता 108 या सरकारी ॲम्बुलन्सचा सेवेचा देखील लाभ घेण्यात यावा. 

हेही वाचा > पोल्ट्री व्यवसायाला जिल्हा पोलिस अधीक्षक आरती सिंह यांचा दिलासा...लॉकडाऊनमध्येही मिळणार चिकन अन् अंडी!

व्हाट्सॲप  नंबर
1 ) 7020583176 
2 ) 8485810477 
3 ) 7709295534 
4 ) 9373800019 
5 ) 02532971233 ( औद्योगिक परवानगी करीता )

हेही वाचा >"घरात कंटाळा येतोय.. विनाकारण घराबाहेर पडायचयं? तर घ्या मग पोलिसांतर्फे मोफत मसाजसेवा!"....सोशल मिडीयावर व्हायरल​

नागरीक http://corona.nashikcitypolice.gov. in या संकेतस्थळावरही ऑनलाईन अर्ज करू शकतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona Help room Service for essential, urgent and medical transportation nashik marathi news