दिलासादायक! जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुक्त रुग्ण अधिक; नवे १ हजार १०७ बाधित

अरुण मलाणी
Tuesday, 15 September 2020

मंगळवारी बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीण भागातील रूग्‍णांची संख्या सर्वाधिक ९५६ इतकी होती. तर नाशिक शहरातील ५०२ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगावचे पाच तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

नाशिक : जिल्‍ह्‍यात सलग दुसर्या दिवशी बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या लक्षणीय राहिली. मंगळवारी (ता.१५) नव्‍याने १ हजार १०७ नवीन बाधित आढळलेले असतांना, बरे झालेल्‍या रूग्‍णांची संख्या १ हजार ४६६ इतकी राहिली. अठरा रूग्‍णांचा जिल्‍ह्‍यात कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे. 

ग्रामीण भागातील संख्या सर्वाधिक

मंगळवारी बरे झालेल्‍या रूग्‍णांमध्ये नाशिक ग्रामीण भागातील रूग्‍णांची संख्या सर्वाधिक ९५६ इतकी होती. तर नाशिक शहरातील ५०२ रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. मालेगावचे पाच तर जिल्‍हाबाह्य तीन रूग्‍ण कोरोनामुक्‍त झाले आहेत. नव्‍याने आढळलेल्‍या बाधितांमध्ये नाशिक शहरातील ८१२, नाशिक ग्रामीणचे २६२, मालेगावचे वीस, तर जिल्‍हाबाह्य तेरा रूग्‍णांचा समावेश आहे. तर मृतांमध्ये नाशिक शहरातील नऊ, ग्रामीणचे चार, मालेगाव महापालिका हद्दीतील पाच रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. जिल्‍ह्‍यातील एकूण बाधितांचा आकडा ५५ हजार ९४० वर पोहोचला असून, यापैकी ४४ हजार ६८० रूग्‍णांनी कोरोनावर मात केली आहे. १ हजार ०९१ रूग्‍णांचा मृत्‍यू झाला आहे. तर सद्यस्‍थितीत १० हजार १६९ बाधितांवर जिल्‍ह्‍यात उपचार सुरू आहेत. दिवसभरात नाशिक महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ८३५, नाशिक ग्रामीण रूग्‍णालये व गृहविलगीकरणात १८४, मालेगाव महापालिका रूग्‍णालये व गृहविलगीकरणात ३७, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालय २८, जिल्‍हा रूग्‍णालयात पंधरा संशयित दाखल झाले आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

 
दोन लाख रूग्‍णांची चाचणी 

जिल्‍ह्‍यात दोन लाख रूग्‍णांच्‍या चाचणीचा टप्पा गाठला आहे. आजवर २ लाख ५८८ रूग्‍णांचे अहवाल तपासणीसाठी घेतले होते. यापैकी ५५ हजार ९४० रूग्‍णांचे अहवाल पॉझिटीव्‍ह आले असून, हे प्रमाण २७.८९ टक्‍के आहे. १ लाख ४२ हजार ९७८ रूग्‍णांचे अहवाल निगेटीव्‍ह आले असून, हे प्रमाण ७१.२८ टक्‍के आहे. तर १ हजार ६७० रूग्‍णांचे अहवाल प्रलंबित आहे. जिल्‍ह्‍यात सर्वाधिक तपासण्या नाशिक महापालिका हद्दीत केल्‍या आहेत. १ लाख ३७ हजार ६७० रूग्‍णांचे अहवाल तपासले आहेत. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

 

संपादन - रोहित कणसे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patient updates in nashik marathi news