सावधान! जिल्हा वळतोय डेंजर झोन कडे...संसर्ग वाढतोय!

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 18 June 2020

 जिल्हा वळतोय डेंजर झोन कडे...संसर्ग वाढतोय! मालेगाव वगळता जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी (ता. 17) जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, यात नाशिक शहरातील सहा, तर नाशिक तालुक्‍यातील जलालपूर येथील एकाचा समावेश आहे.

नाशिक : मालेगाव वगळता जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. बुधवारी (ता. 17) जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी सात जणांचा मृत्यू झाला असून, यात नाशिक शहरातील सहा, तर नाशिक तालुक्‍यातील जलालपूर येथील एकाचा समावेश आहे. मृतांमध्ये वडाळागावातील 60 वर्षीय डॉक्‍टराचाही समावेश आहे. दरम्यान, दिवसभरात 117 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये येवल्यात 16, बागलाणच्या जायखेड्यात 21 आणि नाशिकमध्ये 32 रुग्णांचाही समावेश आहे. 

दिवसभरात 117 कोरोनाबाधित रुग्ण; आणखी सात बळी 

बुधवारी झालेल्या मृतांमध्ये नाशिक तालुक्‍यातील जलालपूर (चांदशी) येथील 52 वर्षीय पुरुषाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. जुन्या नाशिकमधील दूध बाजार परिसरातील 45 वर्षीय व शालिमार परिसरातील 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. आजच त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नाशिक शहरातील सुखसागर नगरमधील 25 वर्षीय तरुण, पंचवटीतील 70 वर्षीय वृद्ध, शिंगाडा तलाव परिसरातील 65 वर्षीय वृद्ध आणि वडाळागावातील 60 वर्षीय डॉक्‍टराचा बुधवारी कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 142 झाला आहे. यात नाशिक शहरात 40, ग्रामीणमध्ये 20, मालेगावात 67, तर परजिल्ह्यातील नऊ मृतांचा समावेश आहे. 
 
जिल्ह्यात 95 कोरोना रुग्ण 
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आणखी 95 ने वाढून दोन हजार 252 झाला आहे. यातील एक हजार 413 रुग्ण उपचार घेऊन कोरोनामुक्त झाले असून, आजमितीस 697 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. प्रलंबित रिपोर्टची संख्या 665 आहे. बुधवारी आलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्टमध्ये मालेगावातील शिवाजीवाडी, इस्लामाबाद, गणेशवाडीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ग्रामीणमध्ये बागलाण तालुक्‍यातील जायखेडा येथे 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून, यात सहा महिन्यांच्या चिमुकल्याचाही समावेश आहे. येवल्यात 16, विंचूरगवळी येथे चार, गिरणारेत एक, भगूरमध्ये एक, इगतपुरीत दोन, ताहाराबादमध्ये दोन, मुंजवाडमध्ये दोन, अमोडेत एक, सटाण्यातील जयपूरवाडीत पाच, सोमपूरमध्ये एक, अघारमध्ये एक, सटाण्यात दोन आणि निफाड तालुक्‍यातील करंजगावमध्ये एकाला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. नाशिक शहरातील वडाळानाका येथील 72 वर्षीय महिलेसह जुन्या नाशिकच्या दूध बाजारातील 45 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली. कोकणीपुऱ्यातील 65 वर्षीय पुरुष, कामटवाड्यातील 45 वर्षीय पुरुष, गंगापूर रोडच्या थत्तेनगरमधील 49 वर्षीय पुरुष, बोरगडला 36 वर्षीय पुरुष, गंजमाळच्या सहकारनगरमध्ये 61 वर्षीय पुरुष, फुले मार्केटमधील 80 वर्षीय वृद्ध, जीपीओ रोड परिसरातील 52 वर्षीय पुरुष, शालिमारचे 67 वर्षीय पुरुष, रेडक्रॉस परिसरातील 55 वर्षीय पुरुष, विसे मळ्यातील 32 वर्षीय पुरुष, उपनगरची 66 वर्षीय महिला व 24 वर्षीय तरुण, दूधबाजारातील 48 वर्षीय महिला, मखमलाबाद येथील 53 वर्षीय पुरुष, पखाल रोडवरील 32 वर्षीय पुरुष व 60 वर्षीय महिला, नाशिक रोडचा 47 वर्षीय पुरुष, कथड्यातील 42 वर्षीय महिला, सिडकोतील शिवाजी चौकातील 71 वर्षीय वृद्ध, फुले मार्केटमधील 50 वर्षीय महिला, कोकणीपुऱ्यातील 46 व 38 वर्षीय पुरुष, पेठ रोडला 45 वर्षीय पुरुष, काठे गल्लीत 36 वर्षीय पुरुष, उपनगरला 32 वर्षीय पुरुष, कामटवाड्यात 57 व 31 वर्षीय महिला, वडाळा रोडला 37 वर्षीय महिला, 28 वर्षीय तरुण आणि अयोध्या कॉलनीतील 40 वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट
 
* जिल्ह्यातील कोरोनाबाधित : 2274 
मालेगाव : 896 
नाशिक : 861 
उर्वरित जिल्हा : 441 
परजिल्हा : 76 
कोरोनामुक्त : 1413 

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

* आत्तापर्यंतचे कोरोना मृत्यू : 142 
ग्रामीण : 20 
नाशिक : 46 
मालेगाव : 67 
परजिल्हा : 9 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corona patients increased throughout the day nashik marathi news