कोरोना रुग्णांना पुरेशा सुविधा मिळाव्यात; तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महापालिका आयुक्तांना साकडे

प्रमोद सावंत
Thursday, 10 September 2020

महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत असलेली रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी खुली करावीत. सदर रुग्णालये कोरोना रुग्ण घेण्यास नकार देत आहेत. संबंधितांना तसे आदेश देऊन रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

नाशिक : (मालेगाव) शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महात्मा फुले जीवनदायी योजनेंतर्गत असलेली रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी खुली करावीत. सदर रुग्णालये कोरोना रुग्ण घेण्यास नकार देत आहेत. संबंधितांना तसे आदेश देऊन रुग्णांची हेळसांड थांबवावी अशी मागणी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा

शहरात काही खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र येथील उपचार महागडे असल्याने सामान्य रुग्णांना ते परवडत नाही. कोरोना केअर सेंटरमध्ये सामान्य रुग्णांवर उपचार होत आहेत. उपचारासाठी असलेली इंजेक्शने त्यांना मिळत नसल्याने बाहेरुन वाढीव किंमतीत ती घ्यावी लागत आहेत. कोविड सेंटरमध्ये इंजेक्शन उपलब्ध करुन द्यावीत. रुग्णांची हेळसांड थांबवावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. ठाकरे यांच्यासह नितीन बच्छाव, वाय. के. खैरनार, सतिश पगार आदींनी दिला आहे.  

हेही वाचा ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - किशोरी वाघ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona patients should get adequate facilities- Demand to Municipal Commissioner nashik marathi news