ऑक्सिजन अभावी रुग्णांची हेळसांड नको - पालकमंत्री छगन भुजबळ

विनोद बेदरकर
Thursday, 17 September 2020

पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, बेड उपलब्ध असूनही नागरिकांना मिळत नसल्याच्या तक्रारीचे वेळोवेळी मूल्यमापन व्हावे. ऑक्सिजन तुटवड्याबाबत वारंवार चर्चा होते. त्याविषयी नियमितपणे लोकांना माहिती दिली नाही तर भीतीचे वातावरण कायम राहील.

नाशिक : जिल्ह्यात प्रत्येक रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन मिळेल याचे नियोजन करावे. कुठल्याही रुग्णांची ऑक्सिजन अभावी गैरसोय होणार नाही तसेच कोरोनाग्रस्तांना दुप्पट ऑक्सिजन लागेल, अशा पद्धतीने नियोजन करण्याचे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले. 

नियोजन भवनात कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री बोलत होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आदी उपस्थित होते. 

हेही वाचा > धक्कादायक! जिल्हा रुग्णालयात गळफास घेऊन युवकाची आत्महत्या; कुटुंबियांचा आक्रोश 

पुरेसे मनुष्यबळ, वैद्यकीय अधिकारी, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर, बेड उपलब्ध असूनही नागरिकांना मिळत नसल्याच्या तक्रारीचे वेळोवेळी मूल्यमापन व्हावे. ऑक्सिजन तुटवड्याबाबत वारंवार चर्चा होते. त्याविषयी नियमितपणे लोकांना माहिती दिली नाही तर भीतीचे वातावरण कायम राहील. सध्या जिल्ह्यात एक हजार रुग्णांसाठी २४ ते २५ मे. टन ऑक्सिजनची गरज आहे. पण तर ४३ मे.टन ऑक्सिजन उपलब्ध आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय कारणासाठीच झाला तर सध्याचा साठा पुरेसा उपलब्ध आहे, त्यामुळे वैद्यकीय कारणासाठीच ऑक्सिजनचा पुरवठा होईल. याचे प्रशासनाने व्यवस्थापन करावे. ऑक्सिजन वाहतुकीसाठी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी रोज २ टॅंकर पुरवण्याचे आश्‍वासन दिल्याचे श्री भुजबळ यांनी सांगितले. 

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर 

कोरोनाग्रस्तांना दुप्पट ऑक्सिजन लागेल. या अंदाजाने भविष्याचे नियोजन करावे, असे निर्देश देत पालकमंत्री भुजबळ यांनी, जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन सेंटर्स साठी तात्काळ ई-निविदा काढून काम सुरु करावे. रुग्णाला कुठल्याही पेशंटला ऑक्सिजनची कमतरता सद्यस्थितीत भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. ऑक्सिजन बेड व व्हेंटीलेटर संख्या वाढविण्याचे नियोजन करावे. अशा सूचना दिल्या. अनलॉक काळात नागरिकांनी मास्क व सोशल डिस्टन्सिंगचा वापर करावा. जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिमेसाठी प्रत्येक विभागाने पुढाकार घ्यावा. घ्यावी. 
महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवून द्यावा. आदी सूचना श्री भुजबळ यांनी दिल्या. 

हेही वाचा > जिवलग मित्रांची 'ती' सहल शेवटचीच! कोरोना काळात पर्यटनस्थळ बंदी नावालाच; प्रशासनाची भूमिका संशयास्पद 

कोवीड सेंटरचे उध्दाटन 

पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या पुढाकारातून ‘आयुक्तालयातील पोलिसांसाठी १०० बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून उद्या शुक्रवारी (ता.१८) सायंकाळी पाचला उद्घाटन होणार आहे. पोलीस व त्यांच्या नातेवाइकांसाठी रुग्णवाहिका व उपचारांची सोय त्यात, असणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona review meeting chhagan bhujabal nashik marathi news