esakal | इथेही 'त्याचाच' चमत्कार! येवल्याचा कोरोनाचा वाढता आलेख आला खाली; हे केवळ शक्य झाले ते...
sakal

बोलून बातमी शोधा

corona commodities.jpg

२२ एप्रिलला येवला तालुक्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या चिंतेत टाकत होती. मात्र चार महिन्यांनंतर शेजारील तालुके हजारांवर पोचले असताना येवल्यात स्थिती नियंत्रणात आहे.मालेगाव व नाशिकनंतर झपाट्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चर्चेत आलेल्या येवला तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख उतरता झाला आहे. हे केवळ शक्य झाले ते त्या गोष्टींमुळेच...वाचा सविस्तर..

इथेही 'त्याचाच' चमत्कार! येवल्याचा कोरोनाचा वाढता आलेख आला खाली; हे केवळ शक्य झाले ते...

sakal_logo
By
संतोष विंचू

नाशिक / येवला : २२ एप्रिलला येवला तालुक्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या चिंतेत टाकत होती. मात्र चार महिन्यांनंतर शेजारील तालुके हजारांवर पोचले असताना येवल्यात स्थिती नियंत्रणात आहे.मालेगाव व नाशिकनंतर झपाट्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चर्चेत आलेल्या येवला तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख उतरता झाला आहे. हे केवळ शक्य झाले ते त्या गोष्टींमुळेच...वाचा सविस्तर..

..यामुळे येवल्यात कोरोना नियंत्रणात 

मालेगाव व नाशिकनंतर झपाट्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने चर्चेत आलेल्या येवला तालुक्यात कोरोनाचा वाढता आलेख उतरता झाला आहे. २२ एप्रिलला येवला तालुक्यात पहिला रुग्ण सापडल्यानंतर वाढलेली रुग्णसंख्या चिंतेत टाकत होती. मात्र चार महिन्यांनंतर शेजारील तालुके हजारांवर पोचले असताना येवल्यात स्थिती नियंत्रणात आहे. हे केवळ शक्य झाले ते काढा, इम्युनिटी बूस्ट, नागरिकांसह लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि आरोग्य विभागाने घेतलेल्या काळजीमुळेच. तालुक्यात आता कोरोनाबाधितांची संख्या २८४ आहे. 

 जिथेतिथे काढ्याची चर्चा... 
पॉझिटिव्ह, संपर्कातील व लक्षणे असलेल्या हजारांवर नागरिकांना येथील आयुर्वेदाचार्य डॉ. महेश्वर तगारे यांनी आयुर्वेदिक काढा दिले. आयुष मंत्रालयाने सुचवलेले काढेही घरोघरी बनवले जात आहेत. अर्सेनिक अल्बम या होमिओपॅथिक गोळ्यासह आयुष काढ्याचे संतोष जनसेवा मंडळाचे अध्यक्ष कुणाल दराडे, भाजपचे आनंद शिंदे यांसह डॉक्टरांनी मोफत वाटप केले. नागरिकांना आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी फायदा झाल्याचा विश्वास तालुका आरोग्याधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड यांनीही व्यक्त केला. 

हेही वाचा > अचानक सायरनचा तो धडकी भरविणारा आवाज..नागरिकांत घबराट अन् सुटकेचा निश्वास! काय घडले नेमके?

मृतांचा आकडा चिंताजनक 
रुग्णवाढ मर्यादित असली तरी येथील मृतांचा आकडा चिंतेचा असून, मागील चार दिवसांत तीन जण दगावले आहे. अर्थात, सर्व मृत हे विविध आजारांनी ग्रस्त होते. आतापर्यंत तालुक्यात कोरोनाने २२ बळी गेले आहेत. सद्यःस्थितीत तालुक्यात परिस्थिती गंभीर नसली तरी रोजच दोन-चार रुग्ण निघत असल्याने चिंताही वाढत आहे. मागील चार दिवसांत येथे २० रुग्ण निघाले असून, ॲक्टिव रुग्णसंख्या १० ते २० च्या दरम्यान राहत आहे. 

हेही वाचा > शिवप्रेमींत हळहळ; शिवप्रेमी रितेशची किल्ल्यावरील 'ती' सेल्फी शेवटची ठरली, काय घडले?

पालकमंत्री छगन भुजबळांनी दिल्या सुचना

पालकमंत्री छगन भुजबळांनी दर आठवड्याला येऊन बैठक घेतल्याच; पण शिक्षकांच्या मदतीने घरोघर सर्वेक्षणाच्या सूचना दिल्या. आरोग्य विभागाने यातील २५ हजार कोमॉर्बिड रुग्णांना रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (इम्युनिटी बूस्ट) व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, टॅबलेट झिंक औषधे वाटप केले. खासदार डॉ. भारती पवार, आमदार नरेंद्र दराडे, आमदार किशोर दराडे, बाळासाहेब लोखंडे यांनीही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वेळोवेळी केलेल्या सूचना उपयुक्त ठरल्या आहेत.

आतापर्यंतचा इतिहास 
महिना रुग्णसंख्या
 

एप्रिल ७ 
मे ३५ 
जून ९४ 
जुलै ११३ 
ऑगस्ट ३५ 

एकूण कोमॉर्बिड - ३४ हजार ५७६ 
बाधित गावे - २५ 
आजपर्यंत तपासलेले स्वॅब - ७७५ 
एकूण पॉझिटिव्ह - २८४ 
शहर -२०३ 
ग्रामीण - ८१ 
बरे झालेले - २४० 
बरे होण्याचे प्रमाण ८५ % 
उपचार घेत असलेले २२ 


प्रशासनाच्या नियोजनासह नागरिक घेत असलेल्या दक्षतेमुळे स्थिती कंट्रोलमध्ये आहे. यापुढेही निष्काळजीपणा न दाखवता प्रत्येक नागरिकाने काळजी घ्यावी. सर्वांच्या प्रयत्नांतून कोरोनाला हरवायचे आहे. -सोपान कासार, प्रांताधिकारी, येवला 

रिपोर्ट : संतोष विंचू 

संपादन - ज्योती देवरे

go to top