महापालिकेने डॉक्टरांना पन्नास लाखांचे विमाकवच द्यावे 

विक्रांत मते
Thursday, 10 September 2020

शासनाने वैद्यकीय सेवेचे दर वाढवावेत, तीन पीपीई किट व आयसीयूसाठी किमान पाच पीपीई किटचा अतिरिक्त खर्च घेण्यास मंजुरी द्यावी किंवा महापालिकेने ऑक्सिजन व पीपीई किटचा खर्च करावा, व्हेंटिलेटर बेडसंदर्भात खासगी रुग्णालयांची बदनामी केली जात आहे. त्यासंदर्भात महापालिकेने रुग्णालयांची बाजू घ्यावी,

नाशिक : कोरोनाकाळात कार्यरत असलेल्या डॉक्टरांना महापालिकेने पन्नास लाखांचे विमाकवच द्यावे, यांसह अनेक मागण्यांचे निवेदन बुधवारी (ता.९) शहरातील डॉक्टरांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिले. 

शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले निवेदन..या आहेत मागण्या  

केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण निधीतून डॉक्टरांसाठी पन्नास लाखांचा जीवन विमा जाहीर केला आहे. त्याचा लाभ डॉक्टरांना मिळावा व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर नाशिक महापालिकेनेही शहरात कार्यरत आरोग्य कर्मचाऱ्यांचा विमा उतरवावा, शासनाने वैद्यकीय सेवेचे दर वाढवावेत, तीन पीपीई किट व आयसीयूसाठी किमान पाच पीपीई किटचा अतिरिक्त खर्च घेण्यास मंजुरी द्यावी किंवा महापालिकेने ऑक्सिजन व पीपीई किटचा खर्च करावा, व्हेंटिलेटर बेडसंदर्भात खासगी रुग्णालयांची बदनामी केली जात आहे. त्यासंदर्भात महापालिकेने रुग्णालयांची बाजू घ्यावी, राजकीय संघटनाकडून खासगी रुग्णालयांवर होणाऱ्या आरोपांवर बंदी आणून गुन्हे दाखल करावेत, हॉस्पिटलसंदर्भात प्रशासनाने जनजागृती करावी व सकारात्मक भूमिका ठेवावी, बायोमेडिकल वेस्ट, औषधे, सर्जिकल वस्तूंची किंमत कमी करावी, खासगी हॉस्पिटलसाठी घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिलात सवलत मिळावी आदी मागण्या डॉ. ज्ञानेश्‍वर थोरात यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आयुक्त जाधव यांच्याकडे केल्या.  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! मोबाईल मिळेना म्हणून भितीपोटी विद्यार्थीनीची आत्महत्या; ऑनलाइन शिक्षणाचा आणखी एक बळी

हेही वाचा > संतापजनक! कोरोनाबाधित महिलेचा सफाई कर्मचाऱ्याकडून विनयभंग; घटनेनंतर रुग्णालयात खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: corporation should pay policy to doctors nashik marathi news