वृक्षदेवाची साक्ष..स्वर्गीय आई-वडिलांचे आशिर्वाद.. अन् बांधली साता जन्माची गाठ!

 IMG-20200507-WA0044
IMG-20200507-WA0044
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील नामांकित सह्याद्री फार्म येथे दीपक प्रोडक्‍शन सुपरवायझर आहे. तर माधुरी महात्मा गांधी शिक्षण संस्थेत लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात गणित विषयाची प्राध्यापक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी देशभरात लॉकडाऊन लागू आहे. यामुळे यंदाच्या लग्नसराईवरही त्याचा प्रभाव जाणवतोय. अशा स्थितीत मित्र मंडळी, नातलग, शाही बडेजाव या सर्वांना फाटा देत निसर्गाच्या सानिध्यात मोजक्‍यात मंडळीच्या साक्षीने लग्न करून या दांपत्याने आदर्श निर्माण केलाय. यापूर्वीच सोशल मिडियावर दीपक आणि माधुरी यांनी आपल्या मित्रमंडळी, नातलग यांना पत्रिका पाठवली आणि पत्रिकेत ठळक अक्षरात घरी राहूनच आम्हला शुभाशीर्वाद द्या, असे नमूद केले होते.
 

दु:ख सोसत माधुरीचे सुखद आयुष्यात पदार्पण
मूळ चांदवड तालुक्‍यातील उसवाड गावच्या गायकवाड कुटुंबातील माधुरी. गेल्या वर्षीच त्यांच्या घरावर काळाने झडप घातली. प्रा. माधुरी यांच्या आई-वडिलांचे ठरविक अंतराने दुर्दैवी निधन झाले. त्यामुळे माधुरी आपल्या आजोळी सय्यद पिंपरी येथे येऊन स्थायिक झाल्या. कुटुंबावर कोसळलेले दु:ख सोसतांना, त्यांनी नुकतेच सुखद आयुष्यात पदार्पण केले आहे.

जेवण साधे पद्धतीने

दीपक सय्यद पिंपरीतील शेतकरी चंद्रकांत शिरसाठ यांचा मुलगा. पुरोगामी विचारसरणीच्या या दोन्ही कुटुंबीयांनी अतिशय सध्या पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेत तो तडीस नेला. मोजकीच मंडळी असल्याने घरातील महिलांनी साधेपणाने जेवण बनवून लग्न सोहळ्याची सांगता केली. गावात या लग्नाची बातमी पसरताच गावातील मंडळी नव दाम्पत्याला शुभाशीर्वाद देण्यासाठी यायला लागली तोवर लग्न समारंभ आटोपला होता. या प्रकारे लग्न करून नवदाम्पत्याने पर्यायाने सय्यद पिंपरी गावाने समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com