खेळ कुणाला दैवाचा कळला! 'ती' सात पावलं दाम्पंत्यासाठी ठरली शेवटची

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 22 October 2020

दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच होत्याच नव्हतं. अग्निच्या साक्षीने सात फेऱ्यात एकमेकांसाठी आयुष्य वाहून दिलेल्या पती-पत्नीचा शेवटही सोबतच. घटनेने संपूर्ण गाव हादरले. वाचा काय घडले?

नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच होत्याच नव्हतं. अग्निच्या साक्षीने सात फेऱ्यात एकमेकांसाठी आयुष्य वाहून दिलेल्या पती-पत्नीचा शेवटही सोबतच. घटनेने संपूर्ण गाव हादरले. वाचा काय घडले?

अशी आहे घटना

जेलरोड येथील कन्या शाळेसमोर रस्ता ओलांडतांना मालट्रकने उडविल्याने लाखलगाव येथील पती-पत्नी जागेवर ठार झाल्याची घटना बुधवारी (ता. 21) घडली. चंद्रभान जाधव (41), मनीषा जाधव (रा. लाखलगाव) असे दाम्पत्याचे नाव आहे. दोघे कन्या शाळेसमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी जेलरोडच्या दिशेने येणाऱ्या भरधाव ट्रकने (एमएच 04,डीएस 3513) त्यांना जोरदार धडक देत त्यांना चिरडले. अपघातात दांम्पत्य जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच उपआयुक्त विजय खरात, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली घटनास्थळी दाखल झाले. चालक शेख हसन भिकन (रा. सिन्नर) याच्याविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >  क्रूर नियती! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीभक्ताचा दुर्देवी अंत; कुटुंबियांचा आक्रोश

दरम्यान, जेलरोडमार्गे नांदूर नाका ते बिटको चौक यादरम्यान अवजड वाहनांना प्रवेशबंदी आहे. मात्र नांदूर नाका येथून अवजड वाहने येत असतात. त्यामुळे नांदूर नाक्यावरील वाहतूक पोलीस करतात काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा >  मध्यरात्रीस खेळ चाले! गायींना भुलीचे औषध देऊन तस्करी; महागड्या गाड्यांचा वापर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The couple was crushed by a pickup truck at Jail Road nashik marathi news