धक्कादायक..मुंबई-आग्रा महामार्गावर संशयास्पद ट्रक..गावकऱ्यांना संशय..संतापात तोडफोड.

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 6 July 2020

शेख यांनी सांगितले, की काही लोकांनी वाहनास अडवून वाहनाचे नुकसान करत "आम्ही चंदन भास्करे व पवार यांचे माणसं असून, चुकीच्या पद्धतीने काम करू देणार नाही', असे म्हणून मारहाण केली.

नाशिक / सिडको : शेख यांनी सांगितले, की काही लोकांनी वाहनास अडवून वाहनाचे नुकसान करत "आम्ही चंदन भास्करे व पवार यांचे माणसं असून, चुकीच्या पद्धतीने काम करू देणार नाही', असे म्हणून मारहाण केली. काय घडले नेमके?

असा घडला प्रकार
मुंबई-आग्रा रोडवरून एका आयशर ट्रकमध्ये (एमएच 15, जीव्ही 1501) गोमांस नेत असल्याचा संशय काही जणांना आला. त्यानंतर संबंधित गाडीला आठ-दहा जणांनी आडवून गाडीची मोडतोड केली. याप्रकरणी गाडीचे चालक अल्ताफ आयुब शेख यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. शेख यांनी सांगितले, की काही लोकांनी वाहनास अडवून वाहनाचे नुकसान करत "आम्ही चंदन भास्करे व पवार यांचे माणसं असून, चुकीच्या पद्धतीने काम करू देणार नाही', असे म्हणून मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर पोलिस कर्मचारी धनंजय दोबाडे यांनीही फिर्याद दाखल केली आहे. पोलिस कर्मचारी दोबाडे यांनी असे नमूद केले आहे, की मुंबई-आग्रा महामार्गावरून जाणारे हे वाहन काही लोकांनी अंबड पोलिस ठाण्यालगत आणून उभे केले. त्यांची चौकशी केली असता, वाहनात मांस असून तुम्ही चौकशी करा, असे सांगून ते निघून गेले.

हेही वाचा >प्रेरणादायी..! पत्नी खंबीर.. बेरोजगार व्यावसायिक पतीला दिली अशी साथ...संसाराचा केला स्वर्ग!​

या घटनेविषयी दोन परस्परविरोधी गुन्हे

त्यांचा शोध घेतला असता, ते मिळून आले नाही. मात्र आयशरमध्ये मांस आढळल्याने वाहन व मांस जप्त केले आहे. संबंधित प्रकार हा गोमांस संबंधात असला तरी काही लोकांनी कायदा हातात घेऊन गाडीची तोडफोड करून वाहनचालकाला मारहाण केली आहे. त्यामुळे अशाप्रकारे कायदा हातात घेणाऱ्यांवर सुद्धा कारवाई करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांनी सांगितले. गोमांस घेऊन जाणाऱ्या वाहनाची काही व्यक्तींनी तोडफोड करून संबंधित वाहन अंबड पोलिस ठाण्यात जमा केल्याची घटना घडली आहे. या घटनेविषयी दोन परस्परविरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! "...तर गौरव आज आमच्यात असला असता.."आरोप करत नातेवाईकांनी फोडला हंबरडा..आरोग्य केंद्राची तोडफोड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cow meat transport vehicle Filed a case at Ambad police station nashik marathi news