दुर्दैवी घटना! ट्रक अचानक घुसला घरात; पण होती गाय म्हणुन वाचली माय.. 

प्रशांत पवार
Sunday, 9 August 2020

काळ आला होता पण वेळ नव्हती, असे आपण ऐकतो, पण असाच प्रकार शनिवारी (ता.८)  मालेगाव येथील हॉटेल आशियाना नांदगाव फाटाजवळ घडला. गाईला आपण माताच म्हणतो..आज त्याच गाईमुळे कुटुंबीयांचे प्राण वाचले. वाचा थरारक घटना

नाशिक / सौंदाणे : काळ आला होता पण वेळ नव्हती, असे आपण ऐकतो, पण असाच प्रकार शनिवारी (ता.८) सौंदाणे, ता. मालेगाव येथील राष्ट्रीय महामार्ग ३ वर हॉटेल आशियाना नांदगाव फाटाजवळ घडला. गाईला आपण माताच म्हणतो..आज त्याच गाईमुळे कुटुंबीयांचे प्राण वाचले. वाचा थरारक घटना

असा घडला प्रकार

सकाळी ६ वाजता मुंबईहून मध्यप्रदेशच्या दिशेने प्लास्टिक दाणे घेऊन जाणाऱ्या मालट्रक (क्रमांक एमपी ०९ एचएच ८४४३) ला दुसऱ्या गाडीची धडक बसली. यात ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने १२ टायरचा अवजड ट्रक रस्त्यापासून १०० मीटरवरील संजय जगन्नाथ पवार यांच्या घराला धडक देत घरात घुसला. घरामध्ये त्यांची आई जिजाबाई पवार व मुलगा यश पवार हे झोपले असताना त्यांच्यापासून चार पाच फुट अंतरावर जाऊन अपघाग्रस्त ट्रक थांबला. यामुळे सुदैवाने आजी आणि नातवाचे प्राण वाचले. मात्र घराजवळ बांधलेल्या गाईला जोरदार धडक बसल्याने तिचा जागीच जीव गेला. पवार यांच्या संपूर्ण घराचे नुकसान झाले. तर ट्रकचालक सदाकत उल्ला सलामत उल्ला (वय ३८, रा. लक्ष्मीबाई रोड रतलाम), असलम अली, हुसेन अब्बासी हे जखमी असून त्यांना खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा - थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

हेही वाचा > नांदगाव हादरले...एकाच कुटुंबातील सर्वांची निघृण हत्या; मोठी खळबळ

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cow saved the life of the family nashik marathi news