आर्श्चयच!..स्वतःला लागणारी वीज अन् ते देखील घरच्या घरीच तयार!...

creation of biogas from kitchen waste.jpg
creation of biogas from kitchen waste.jpg

नाशिक : दिवसेंदिवस घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर वाढतच आहेत. त्यावर मात करण्यासाठी जेलरोड येथील पिंटो कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक सुरेश सोनार व सविता सोनार या दांपत्याने पालेभाज्यांची देठे, शिळे अन्न यांसारखे किचन वेस्ट, फळांच्या साली व हारांची फुले यापासून बायोगॅसची निर्मिती करत एलपीजी गॅसला पर्याय शोधला आहे. शिवाय बायोगॅस वापरामुळे तयार होणारे सेंद्रिय खत विक्रीतून अर्थाजनदेखील सुरू केले आहे. 

सिलेंडर त्यांना साधारणपणे चार महिने पुरते

सोनार दांपत्याने सौरऊर्जेपासून वीजनिर्मिती करून स्वतःला लागणारी वीजदेखील घरच्या घरीच तयार केली आहे. त्यामुळे जेलरोडचे सोनार दांपत्य खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली दांपत्य ठरले आहे. श्री. सोनार सकाळी व सायंकाळी फेरफटका मारायला गेल्यावर मंदिर परिसरात पडलेली फुले, फळांच्या साली गोळा करून आणतात. बायो गॅसच्या वापरामुळे साधारणत: 80 टक्के गॅसची बचत होत असल्याचे ते सांगतात.  त्यामुळे महिन्याकाठी लागणारे सिलिंडर त्यांना साधारणपणे चार महिने पुरते. शिवाय त्यांनी सौरऊर्जेपासून तयार केलेली वीज ते वीज वितरण कंपनीला देतात व त्यातून त्यांना वीजबिलातही बचत होते. किचन वेस्टपासून बायोगॅसची निर्मिती करून त्याचा वापर करावा. कारण हा गॅस वायुरूप असल्यामुळे हवेत सहज विरतो, असे ते आवर्जून सांगतात. 

बायोगॅस वापरणाऱ्या नागरिकांना घरपट्टीत काही प्रमाणात सूट

गॅसचा स्फोट होऊनही जीवितास धोका होऊ शकत नाही. शिळे अन्न, फळांच्या साली, हारातील फुले हे सर्व बायोगॅसमध्ये टाकले जाते. त्यामुळे परिसरदेखील प्रदूषणमुक्त राहतो. आगामी काळात महागाई वाढल्याने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील वाढतील. त्यामुळे बायोगॅसचा वापर केल्यामुळे आपली बचत होईल, असेही सोनार यांनी सांगितले. महापालिकेकडूनही बायोगॅस वापरणाऱ्या नागरिकांना घरपट्टीत काही प्रमाणात सूट मिळते.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com