प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

विनोद बेदरकर
Monday, 21 September 2020

दरम्यान १६ सप्टेंबर रोजी इंजिनिअर शरद पवार याने भडांगे तसेच त्यांच्या सहकार्‍यास चाकूचा धाक दाखवत प्रहार संघटना, बच्चु कडू यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार हनुमानवाडी परिसरात घडला होता.

नाशिक : ठक्कर बाजार परिसरात एका कार्यालयात झालेल्या मारहाण प्रकरणानंतर प्रहार संघटनेच्या पदाधिकार्‍यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख अनिल भडांगे, युवा प्रमुख जगन काकडे तसेच इतर पदाधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. 

असा आहे प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी प्रहार संघटनेचे पदाधिकारी भडांगे, काकडे व इतर दोघांनी इंजिनिअर शरद पवार यांच्या कार्यालयात आले. कार्यालयात आल्यानंतर पवार यांना बाहेर ओढून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता भंडागे यांनी पीडित महिलेला मारहाण केली. इतर दोघांनी विनयभंग केला, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान १६ सप्टेंबर रोजी इंजिनिअर शरद पवार याने भडांगे तसेच त्यांच्या सहकार्‍यास चाकूचा धाक दाखवत प्रहार संघटना, बच्चु कडू यांना शिवीगाळ केल्याचा प्रकार हनुमानवाडी परिसरात घडला होता. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा प्रकार या वादातून घडल्याची चर्चा होत आहे.

हेही वाचा > थरारक दृश्य! नदीच्या पूरात वाहून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO

हेही वाचा >  मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Crime of molestation on the office bearers of Prahar Sanghatana nashik marathi news