थरारक! पूर्ववैमनस्यातून पितापुत्रावर कोयत्याने हल्ला; घटनेमुळे शहरात खळबळ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 13 January 2021

नेहमी प्रमाणे रात्री आपले किराणा दुकान  बंद करुन घरी निघालेल्या चुलत भावावरच कोयत्याने वार केल्याची घटना भगूर येथे समोर आली आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

देवळाली कॅम्प (नाशिक) : नेहमी प्रमाणे रात्री आपले किराणा दुकान  बंद करुन घरी निघालेल्या चुलत भावावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना भगूर येथे समोर आली आहे. याबाबत देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

वचविण्यासाठी वडिलांवरही धावले पण..

भूषण राजगुरू यांच्या फिर्यादीनुसार सोमवारी रात्री अकरा वाजता आपले किराणा दुकान बंद करून रात्री अकरा वाजेच्या दरम्यान घराकडे जात असतांना त्यांचा चुलत भाऊ सचिन राजगुरू याने रस्त्यात अडवून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागील भांडणाची कुरापत काढून भूषण याच्यावर कोयत्याने वार केले.  दरम्यान भूषण जोरजोरात ओरडत असताना, भूषणला वाचविण्यासाठी त्याचे वडील मोहन राजगुरू आले. परंतु सचिनची आई संगीता व पत्नी जागृती यांनी भूषण व मोहन यांना पकडून ठेवत सचिनने दोघांच्याही डोके, मान, खांद्यावर चाकूसारख्या हत्याराने वार केले. या हल्ल्यात जखमी मोहन व भूषण राजगुरू या दोघा पिता पुत्रास रस्त्यात सोडून हल्लेखोर फरार झाले.

हेही वाचा > संतापजनक प्रकार! शेजारीणच झाली वैरीण; 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला दिले नराधमांच्या ताब्यात

तीन संशयितांना पोलिस कोठडी ​

भूषण यांनी भाऊ शिरीष यास फोनद्वारे घटनेची माहिती दिल्यावर शिरिषने घटनास्थळी येऊन वडील मोहन व भाऊ भूषण या दोघांना प्रथम पालिकेच्या बिटको रुग्णालयात व नंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वरील संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, तिन्ही संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना शुक्रवार (ता. १५)पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे तपास करीत आहेत. 

हेही वाचा > बहिणीच्या लग्नात भावाने दिले अनोखे 'गिफ्ट'; अख्ख्या पंचक्रोशीत होतेय चर्चा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: crime news father and son have been attacked by a man at bhagur nashik marathi news

Tags
टॉपिकस
Topic Tags: